गोपीनाथगडाचे लोकार्पण!

By admin | Published: December 13, 2015 12:07 AM2015-12-13T00:07:38+5:302015-12-13T00:07:38+5:30

(संबंधित बातमी सर्व आवृत्त्यांनी अवश्य वापरावी)

Gopinagadera release! | गोपीनाथगडाचे लोकार्पण!

गोपीनाथगडाचे लोकार्पण!

Next
(स
ंबंधित बातमी सर्व आवृत्त्यांनी अवश्य वापरावी)
-------------
फोटो- 12ुीस्रि16
------------
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मंुडे, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, नामदेव महाराज शास्त्री, खा. चंद्रकांत खैरे आदी.
-------------------

परळीत जयंती सोहळा : अमित शहा, फडणवीस यांची उपस्थिती

प्रताप नलावडे
गोपीनाथगड (परळी) : गोपीनाथ मुंडे यांचे जीवन कायम संघर्षमय राहिले. त्यांच्या संघर्षातूनच भाजपाला राज्यात सत्ता मिळाली, अशी प्रांजळ कबुली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे शनिवारी मुंडे यांचे स्मारक असलेल्या गोपीनाथगडाच्या लोकार्पण सोहळ्यात दिली.
राज्यात भाजपाला वैभव प्राप्त करुन देत असतानाच मुंडे यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे काम पोहोचविण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात मुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याच ठिकाणी गोपीनाथगडाच्या माध्यमातून त्यांचे स्मृतीस्थळ तयार करण्यात आले आहे. अष्टकोणी कमळाच्या आकारात समाधीस्थळ असून त्याची उंची ७२ फूट आहे. त्याच्याच बाजुला २२ फूट उंचीचा त्यांचा पंचधातूपासून तयार केलेला पुतळाही उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण आणि ५० फूट उंचीच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
गोपीनाथगडाची निर्मिती समाजाच्या पैशांतून झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. गोपीनाथरावांच्या मृत्यूनंतर पंकजा यांनी नेतृत्व स्वीकारून लोकांना दिल्याचेही ते म्हणाले.
गोपीनाथगडाच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब आणि मजुरांच्या आर्थिक उन्नतीचा विडा आपण उचलला असून बाबांना अपेक्षित असलेल्या विकासाचे आणि समाजकार्याचे माध्यम म्हणून हा गड कार्यरत राहणार असल्याची ग्वाही ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
भगवानगडाचे नामदेव महाराज शास्त्री यांनी, आता पंकजाला जे काही मनातील बोलायचे असेल आणि जे काही निर्णय जाहीर करायचे असतील ते तिने गोपीनाथगडावरून करावेत, असे सांगत भगवानगड हा आता श्रद्धेचा असेल तर गोपीनाथगड हा राजकारणासाठी असेल असे स्पष्ट केले.
राज्याच्या प्रभारी सरोज पांडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खा. प्रीतम मुंडे, खा. रामदास आठवले, खा. राजू शे˜ी, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. विनायक मेटे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
----------
एक पोते भरून चेक
स्मारकासाठी एक वीट आपलीही असावी, असे वाटणारे लोक हे अगदी ऊस तोडणी कामगार म्हणून काम करणारे आहेत. एका महिलेने अकरा रूपये आपल्या हातावर ठेवत गडासाठी हे माझे पैसे घे, असे अधिकारवाणीने सांगितले. गडासाठी आलेल्या पैशांचे चेकने एक पोते भरले असून दोन कोटी रुपयांचा निधी जमा झाल्याचेही पंकजा यांनी सांगितले.
--------

Web Title: Gopinagadera release!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.