गोरखपूर बालमृत्यू प्रकरण : मृतांची संख्या १0५ वर, बालमृत्यूवरून राज्यात राजकारण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:55 AM2017-08-20T00:55:53+5:302017-08-20T00:56:14+5:30

Gorakhpur child death case: Death toll in 105, infant mortality in the state | गोरखपूर बालमृत्यू प्रकरण : मृतांची संख्या १0५ वर, बालमृत्यूवरून राज्यात राजकारण सुरू

गोरखपूर बालमृत्यू प्रकरण : मृतांची संख्या १0५ वर, बालमृत्यूवरून राज्यात राजकारण सुरू

Next

गोरखपूर : बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मृतांची संख्या १0५ वर गेली असली तरी उत्तर प्रदेश सरकार त्याकडे फारशा गंभीरपणे पाहताना दिसत नसल्याचे जाणवत आहे. गुरुवार व शुक्रवारी १0 जणांचे मृत्यू झाल्याने हॉस्पिटल प्रशासनानेही मान्य केले.
आॅगस्टरच्या दुसºया आठवड्यात ३0 बालकांचे मृत्यू झाल्यावर असे घडले नाही, असे सरकार सांगत होते. नंतर आकडा ७ आहे, असे मान्य केले. नंतर संख्या ६३ वरून वाढत गेली आणि आता ती १0५ झाली.
हॉस्पिटलमधील बालमृत्यूवरून राज्यात राजकारण सुरू झाले असून, विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, हे आधीच्या सरकारचे पाप आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी
जबाबदारी अखिलेश यादव सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. समाजवादी पक्षाने मात्र नव्या सरकारच्या भ्रष्ट व गैरकारभाराचा हा नमुना असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी
यांनी रविवारी सकाळी गोरखपूरमध्ये
येऊ न चार मृत मुलांच्या नातेवाईकांची
भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ हेही गोरखपूरला आले आणि त्यांनी
हातात झाडू घेऊ न, परिसर स्वच्छ करतानाची छायाचित्रे काढून घेतली. त्यानंतर गोरखपूरला पिकनिक स्पॉट बनवण्याची परवानगी युवराजांना दिली जाणार नाही, असे विधान राहुल गांधी यांना उद्देशून केले.
आपल्यासोबत कोणीही डॉक्टर अथवा अ‍ॅम्बुलन्स नकोय, असे राहुल यांनी दौºयाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. डॉक्टरांची गरज मेंदूज्वराच्या रुग्णांना आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Gorakhpur child death case: Death toll in 105, infant mortality in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.