5 वर्षांच्या लग्नावर भारी पडलं 5 महिन्यांचं प्रेम; पतीनेच लावलं पत्नीचं बॉयफ्रेंडसोबत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 04:39 PM2024-02-02T16:39:09+5:302024-02-02T16:40:08+5:30

पाच वर्षांचं लग्न विसरून पत्नी बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली. कुटुंबीयांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीही ऐकलं नाही.

gorakhpur husband wife marriage with boyfriend two children | 5 वर्षांच्या लग्नावर भारी पडलं 5 महिन्यांचं प्रेम; पतीनेच लावलं पत्नीचं बॉयफ्रेंडसोबत लग्न

5 वर्षांच्या लग्नावर भारी पडलं 5 महिन्यांचं प्रेम; पतीनेच लावलं पत्नीचं बॉयफ्रेंडसोबत लग्न

प्रेमासाठी लोकं वाटेल ते करतात. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात प्रेमप्रकरण आणि लग्नाची एक विचित्र घटना समोर आली आहे. पाच वर्षांचं लग्न विसरून पत्नी बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली. कुटुंबीयांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीही ऐकलं नाही. अखेर पतीनेच तिचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावून दिलं. यानंतर ही महिला आपल्या दोन मुलांसह बॉयफ्रेंडच्या घरी गेली आहे. बखिरा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली.

रामनाथ यादव याचं पाच वर्षांपूर्वी  कुंती यादवसोबत लग्न झालं होतं. सुरुवातीला दोघांचा संसार नीट सुरू होता. नंतर त्यांना दोन मुलंही झाली. चार वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे. रामनाथ हा ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्यावरच घर चालतं. तो सकाळी कामासाठी निघायचा. संध्याकाळी उशिरा घरी परत यायचा.

दरम्यान, शेजारी राहणाऱ्या रंजीत यादवने पती घरी नसल्याचा फायदा घेतला. रामनाथ घरी नसताना त्याच्या पत्नीशी तो गोड गोड बोलू लागला. हळूहळू कुंती यादवशी त्याची जवळीक वाढत गेली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. पाच महिन्यांपूर्वीच हा प्रकार सुरू झाला. रामनाथची पत्नी बॉयफ्रेंडसाठी वेडी झाली. 

रामनाथला हा सर्व प्रकार कळल्यावर त्याने मुलं व कुटुंबाचं कारण देऊन तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ती कोणत्याही परिस्थितीत ऐकायलाच तयार नव्हती. अखेर पतीनेच पत्नीचं लग्न तिच्या बॉयफ्रेंडसोबत लावून दिलं. या प्रकरणाची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

Web Title: gorakhpur husband wife marriage with boyfriend two children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.