स्कूटीला ७० वेळा दंड! एकदाही भरली नाही रक्कम; RTO कारवाई करणार, जाणून घ्या नियम काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 01:48 PM2023-06-22T13:48:33+5:302023-06-22T13:50:40+5:30
दीड वर्षात एका स्कूटीचे ७० वेळा दंड झाला. मात्र एकदाही भरले नाही.
अनेकवेळा आपल्याकडे वाहण चालविताना नियम तोडल्याच्या कारणामुळे ट्राफिक पोलीस दंड आकारतात. आता ऑनलाईन पद्धतीने दंड आकारला जातो, आपल्याला दंड झाल्याची पावती थेट मोबाईलला येते. पण काहीजण या दंडाकडे लक्ष देत नाहीत. ही रक्कम जमा करत नाहीत. पण, हा दंड तुम्ही भरला नाहीत तर तुम्हाला मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागेल. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये दीड वर्षात एका स्कूटीला ७० वेळा नियम तोडल्याचे कारणामुळे दंड करण्यात आला आहे. स्कूटीची किंमत ८५,००० रुपये आहे, तर आत्तापर्यंत ७०,५०० रुपयांचे चलन कापण्यात आले आहे. असे असताना वाहतूक विभागाने सर्वाधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा दहा वाहनांची यादी समोर आणली आहे. अशा वाहनांना पोलिस नोटिसा बजावणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही स्कूटी UP 53 DW 0524 या क्रमांकावर नोंदणीकृत आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये 37 वेळा चालान करण्यात आले होते, तर या वर्षात आतापर्यंत 33 वेळा चालान करण्यात आले आहे. स्कूटीवरून लाल दिवा जंप करण्याबरोबरच हेल्मेट न घातल्याबद्दल चालानही करण्यात आले आहे. गोरखपूरमध्ये खराब वाहतूक व्यवस्था ही मोठी समस्या आहे. महापालिकेच्या निवडणुकीत वाहतुकीसोबतच पाणी तुंबणे हा आणखी एक मोठा मुद्दा ठरला आहे. शहरात वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे अनेक मुख्य चौक जाम होतात. या जॅमपासून सुटका करण्यासाठी गोरखपूर पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी ट्रॅफिक सिग्नल्सची व्यवस्था केली आहे.
PM मोदी US दौऱ्यावर असतानाच आली खुशखबर, भारतीयांना होणार मोठा फायदा
ट्रॅफिक सिग्नलच्या मदतीने सोय होते. दरम्यान, वाहतूक सिग्नलचे नियम कोणी मोडल्यास चौकाचौकात बसविण्यात आलेल्या सुरक्षा कॅमेऱ्यांमध्ये वाहनांचे क्रमांक येतात. यानंतर वाहनांचे स्वयंचलित चलन कापले जाते. यामुळे व्यवस्था सुधारली असली तरी काही लोक वाहनांच्या चालानकडे लक्ष देत नाहीत.
गेल्या वर्षी 36500 रुपयांचे चलन कापले होते आणि आता एकूण 34000 रुपयांचे चलन कापले आहे. आकाश जैन, रीड साहेब धर्मशाळा, अलहदादपूर, गोरखपूर येथे राहणारा, त्याच्याकडे एक अॅक्टिव्हा आहे, ज्याचा क्रमांक UP 53 DW 0524 आहे. या स्कूटीचे गेल्या दीड वर्षात 70 वेळा चालान करण्यात आले आहे, ज्याची एकूण किंमत 70500 रुपये आहे, पण अद्यापपर्यंत हे चलन जमा करण्यात आलेले नाही.
स्कूटी, बुलेट आणि स्पोर्ट्स बाईक सोबतच नियम तोडले, आकाश जैन गोरखपूरमधील वाहनांच्या टॉप टेन चालानच्या यादीत सर्वात वर आहे. त्याच्या स्कूटीचे 2022 मध्ये 37 वेळा आणि 2023 मध्ये 33 वेळा चालान करण्यात आले आहे. त्याचबरोबर या यादीत आणखी नऊ जणांचाही समावेश आहे. त्यापैकी काही असे आहेत की ज्यांना 50 पेक्षा जास्त वेळा चालना देण्यात आली आहे.
वाहनांमध्ये सर्वाधिक वाहतुकीचे नियम तोडण्यात स्कूटीचा क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ बुलेट आणि रेसर बाइक्सचा क्रमांक लागतो.
या प्रकरणाबाबत एसपी वाहतूक एमपी सिंह म्हणाले की, शहरातील 10 वाहनांची यादी तयार करण्यात आली आहे. यातील बहुतांश वाहनांचे चालान करण्यात आले आहे. अशा लोकांना नोटीस पाठवण्याची तयारी आहे, अन्यथा वाहन जप्त केले जाईल. चलन जमा केल्यानंतरच वाहने सोडण्यात येणार आहेत.