गोरक्षकांचा धुडगूस, रस्तारोको

By admin | Published: June 13, 2017 01:53 AM2017-06-13T01:53:53+5:302017-06-13T01:53:53+5:30

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गायींची तस्करी होत असल्याच्या संशयावरून ५० गोरक्षकांनी महामार्ग क्रमांक १५ वर रविवारी रात्री धुडगूस घातला. त्यांनी गायींची

Gorges, ravioli | गोरक्षकांचा धुडगूस, रस्तारोको

गोरक्षकांचा धुडगूस, रस्तारोको

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

जयपूर : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गायींची तस्करी होत असल्याच्या संशयावरून ५० गोरक्षकांनी महामार्ग क्रमांक १५ वर रविवारी रात्री धुडगूस घातला. त्यांनी गायींची वाहतूक करणाऱ्या मालमोटारींवर (ट्रक) तुफान दगडफेक करण्यासह वाहतूक रोखून धरली.
वस्तूत: तामिळनाडूच्या पशुसंवर्धन विभागाने जैसलमेर येथून ५० गायी आणि कालवडींची खरेदी केली होती आणि विभागाचे अधिकारी त्यांना पाच मालमोटारींतून तामिळनाडूला नेत होते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि कागदपत्रे त्यांनी मिळविली होती. याप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली असून, घटना गांभीर्याने न घेतल्यामुळे पोलीस निरीक्षकांसह सात पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.
आरोपींनी तामिळनाडूच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा, त्याचप्रमाणे मालमोटारी पेटविण्याचाही प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यांना रोखले. त्यानंतर तमिळ अधिकारी, ट्रकचालक आणि क्लीनर्स यांना गोरक्षकांच्या ताब्यातून सोडवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अनेक लोक घटनास्थळी गोळा
झाले आणि त्यांनी महामार्ग क्रमांक १५ वर ठिय्या मारून वाहतूक अडविली, असे बारमेरचे पोलीस अधीक्षक गगनदीप सिंगला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
तमिळ पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी जैसलमेरमधील विविध ठिकाणांहून उत्तम वंशाच्या गायींची खरेदी केली होती. त्यांनी गायींच्या वाहतुकीसाठी उपविभागीय अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्याकडून नाहरकत प्रमाणपत्रांसह इतर परवानग्या प्राप्त केल्या होत्या.

५0 जणाविरुद्ध गुन्हा दाखल
आरोपींनी मालमोटारींवर तुफान दगडफेक करून एका मालमोटारीचे नुकसान केले. मालमोटारीतील गायींना तात्पुरते स्थानिक गोशाळेत ठेवण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
५० लोकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला, तसेच राष्ट्रीय महामार्ग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चैनराम, कमलेश, विक्रम आणि जसवंत यांना सोमवारी अटक करण्यात आली.
तामिळनाडूच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे मदतीची मागणी केली. तथापि, पोलीस कर्मचारी उशिरा घटनास्थळी आले.
ही बाब समजल्यानंतर कर्तव्यात कसूर केल्यावरून सदर पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखांसह सात पोलिसांच्या पोलीस मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या.

Web Title: Gorges, ravioli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.