गोरखालॅंड आंदोलनः टॉय ट्रेन स्टेशन पेटवले

By Admin | Published: July 8, 2017 04:27 PM2017-07-08T16:27:00+5:302017-07-08T16:31:23+5:30

गोरखा समर्थकाचा मृतदेह सापडल्यानंतर संतप्त जमावाने सोनाडा येथील दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचे स्टेशन पेटवून दिले.

Gorkhaland Movement: Toy Train Station Colored | गोरखालॅंड आंदोलनः टॉय ट्रेन स्टेशन पेटवले

गोरखालॅंड आंदोलनः टॉय ट्रेन स्टेशन पेटवले

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
दार्जिलिंग, दि. 8- दार्जिलिंगमध्ये सुरु असलेले गोरखालॅंडच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. एका गोरखा समर्थकाचा मृतदेह सापडल्यानंतर संतप्त जमावाने सोनाडा येथील दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचे स्टेशन पेटवून दिले. या गोरखा समर्थकाचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे झाला असा आरोप गोरखा आंदोलकांनी केला आहे. या घटनेनंतर दार्जिलिंगमध्ये लष्कराच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
 
गोरखालॅंडसाठी निदर्शने करत असताना पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात आपला सहकारी याशी भुतिया याचा मृत्यू झाल्याचे म्हणणे आंदोलकांचे आहे. मात्र पोलिसांनी आज कोणत्याही प्रकारचा गोळीबार झालाच नसल्याचे स्पष्ट केले आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाने याशीच्या मृतदेहासह मोर्चा काढणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. तृणमूल कॉंग्रेसचे दार्जिलिंग जिल्हाप्रमुख आणि पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री गौतम देव यांनीही असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले आहे. एका व्यक्तीवर पोलीस कसे गोळीबार करतील असे सांगत त्यांनी गोरखा जनमुक्ती मोर्चाचा आरोप फेटाळला आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बिमल गुरुंग या घटनेवर एक बैठक घेण्याची शक्यता आहे.
 
स्वतंत्र गोरखालॅंडच्या मागणीसाठी ८ जूनपासून आंदोलन करीत असलेल्या जीजेएम कार्यकर्त्यांनी सिंगमारी येथील पक्ष मुख्यालयापासून निषेध मोर्चा काढला होता. आपण आंदोलकांशी चर्चेला तयार आहोत. मात्र, राज्यघटनेचं उल्लंघन केलं जाऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. सरकारला बदनाम करण्यासाठी काही उपद्रवी शक्ती मुद्दाम आंदोलनास चिथावत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, सद्यस्थितीविषयी राज्य सरकारकडून अहवाल आल्याखेरीज केंद्र सरकार सुरक्षा दलांची जादा कुमक पाठविणार नाही, अशी भूमिका केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली होती.

दार्जिलिंगमध्ये ट्युबलाइट मोर्चा
चीनची नजर सिक्कीमवर की गोरखालॅंडवर ?
 
स्वतंत्र गोरखालॅंडच्या आंदोलनाचा आजचा 24 वा दिवस असून, दिवसेंदिवस त्याचे स्वरुप अधिक गंभीर होत चालले आहे. या व्यवसायामुळे सलग तीन आठवडे दार्जिलिंगमधील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असून हॉटेलही ओस पडली आहेत. सिलिगुडी येथील अत्यंत चिंचोळ्या पट्टीने ईशान्य भारत हा उर्वरीत भारताशी जोडलेले आहे. हे आंदोलन याच परिसरामध्ये सुरु आहे. या आंदोलनाचा फटका सिक्किमलाही बसला आहे. राष्ट्रीय महामार्ग 10 हा रस्ता सिक्कीमसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु आंदोलनामुळे सिक्कीमच्या जनजीवनावर परिणाम होत आहे. याबाबत सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चॅमलिंग यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
 
 
 
 

Web Title: Gorkhaland Movement: Toy Train Station Colored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.