गोरक्षक मोकाट! गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अजून एकाची हत्या
By admin | Published: June 29, 2017 09:08 PM2017-06-29T21:08:08+5:302017-06-29T21:08:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षेच्या नावावर चाललेल्या हत्यांचा निषेध केला असला तरी देशभराच गोरक्षणाच्या नावाखालील गुंडगिरी
Next
>ऑनलाइन लोकमत
रामगड, दि. 29 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षेच्या नावावर चाललेल्या हत्यांचा निषेध केला असला तरी देशभराच गोरक्षणाच्या नावाखालील गुंडगिरी सुरूच आहे. पंतप्रधानांच्या भाषणाला काही तास उलटत नाहीत तोच मोकाट सुटलेल्या गोरक्षकांनी झारखंडमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरून एका व्यक्तीची मारहाण करून हत्या केली आहे.
अलिमुद्दीन उर्फ असगर अंसारी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अलिमुद्दीन याचा मांसाचा व्यापार होता. आज तो मारुती व्हॅनमधून मांस नेत असताना त्याच्या गाडीत बीफ असल्याची अफवा परसली. त्यानंतर जमावाने बाजार टांड गावाजवळ त्याच्या गाडीवर हल्ला केला. तसेच गाडीलाही आग लावली. जमावाने केलेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या अलिमुद्दीनला पोलिसानी रुग्णालयाच दाखल केले, पण तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
झारखंड पोलिसांचे प्रवक्त्यांनी सांगितले की, प्राथमित तपासात नियोजबद्धरित्या ही हत्या घडवून आणल्याचे दिसत आहे. तसेच मृताच्या पूर्ववैमस्यातून ही हत्या झाली का या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. मृताच्या वाहनातून मांस सापडले आहे. पण ते बंदी घातलेले मांस आहे का हे तपासानंतरच सिद्ध होणार आहे. दरम्यान या प्रकरणात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आज सकाळीच गो-रक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरक्षकांना दिला होता. गो-रक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही. हे महात्मा गांधींनाही मान्य नव्हते, असे मोदी म्हणाले होते.