गोसावी समाजाचा मूक मोर्चा निवेदन : अत्याचार पीडितांना न्याय मिळण्याची मागणी (बातमीला जोड आहे) बातमीचे इन्फो,फोटो क्रमांक,कॅप्शन जोडमध्ये आहे
By admin | Published: October 8, 2016 11:52 PM2016-10-08T23:52:34+5:302016-10-09T00:05:14+5:30
नाशिक : कोपर्डी, नाशिक व पाथर्डी येथील अत्याचाराच्या घटना मानवी हक्कांना बाधीत करणार्या असून पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील मूकबधिर मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केल्यास ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी संशयित आरोपीने दिली. या प्रकाराने मानवी संस्कृती आणि भारतीय घटनेला धक्का पोहोचविणारा प्रकार घडल्याचे सांगत मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ गोसावी समाजाने शनिवारी (दि.८) मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.

अहमदनगर जिल्ातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर नाशिक आणि पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथेही अशाच प्रकारे पाशवी अत्याचाराच्या घटना घडल्याने समाजातील विविध घटकांमध्ये संतापाचे वातावरण असून विविध समाज मूक मोर्चाच्या माध्यमातून या घटनांचा निषेध नोंदवत आहे. अशाप्रकारचे माणुसकीला काळिमा फासणारे व घृणास्मद कृत्य करणार्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी गोसावी समाजाने शनिवारी पंचवटीतील रामकुं ड परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर समाजातील श्रद्धा भारती, निशा गोसावी, आदिती भारती, मानसी गोसावी, स्नेहा गोसावी या पाच मुलींनी प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. या निवेदनाच्या माध्यमातून अशाप्रकारच्या गुन्ह्यामध्ये दोषी असणार्या नराधमांविरोधात कडक कारवाई करावी, तसेच महाराष्ट्रात एका मागून एक घडत असलेल्या अशा निंदणीय घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींविरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवावे, अशी मागणीही या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दरम्यान, हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. के . गोसावी, प्रदेशाध्यक्ष दत्ता गिरी, जिल्हाध्यक्ष सूर्यभान गोसावी आदिंनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. सरचिटणीस वसंत गोसावी, सुधाकर गवळी, बापू बैरागी, मुक्तेश्वर मुनशेीवार, योगेश बर्वे, संजय गोसावी आदिंसह समाजबांधव उपस्थित होते. वसंत गोसावी सूत्रसंचालन करून आभार मानले.
शिक्षण घ्यायचे कसे- पंचकन्यांचा सवाल
जिल्हाधिकार्यांना निवेदन दिल्यानंतर हुतात्मा स्मारक येथे पंचकन्यांनी निवेदन वाचून दाखवले. समाजातील मुलींची सुरक्षिता धोक्यात असल्याचे सांगत प्रशासनाने महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मुलींना शिक्षणासाठी गावाबाहेर जावे लागते. अशावेळी मुलींची सुरक्षितता महत्त्वाची आहे. सुरक्षित वातावरण नसेल तर मुलींनी शिक्षण घ्यायचे कसे, असा सवालही या पंचकन्यांनी उपस्थित केला.