डोळे काढले, गळा दाबला, ५०० रुपयांसाठी मजुराचा क्रूरपणे केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 18:30 IST2024-01-11T18:30:18+5:302024-01-11T18:30:33+5:30
Bihar Crime News: बिहारमधील आरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे केवळ ५०० रुपयांसाठी चार मित्रांनी मिळून एका मजुराची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

डोळे काढले, गळा दाबला, ५०० रुपयांसाठी मजुराचा क्रूरपणे केला खून
बिहारमधील आरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे केवळ ५०० रुपयांसाठी चार मित्रांनी मिळून एका मजुराची हत्या केल्याचे उघड झाले आहे. याबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार आरोपींनी या मजुराला पार्टी करण्याच्या बहाण्याने बोलावून गळा दाबून त्याला ठार मारले. एवढंच नाही तर आरोपींनी चाकूने त्याचे डोळे बाहेर काढले. तसेच मृतदेह फेकून फरार झाले.
मृताच्याा कुटुंबीयांनी गावातीलच काही लोकांवर हत्येचा आरोप केला आहे. हे प्रकरण मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारा बसंतपूर गावातील आहे. २० वर्षीय मोहन सिंह हा मोलमजुरी करायचा. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवला.
मृताचा मोठा भाऊ राधासिंह याने पोलिसांना सांगितले की, बुधवारी माझा छोटा भाऊ मनोज सिंह याला गावातीलच चार मित्रांनी पार्टीसाठी बोलावले. जेव्हा रात्री उशिरापर्यंत तो आला नाही. तेव्हा आम्ही त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. सकाळी गावातील लोकांनी माझ्या भावाचे चाकून डोळे काढून गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचे सांगितले.
त्याबरोबरच त्याने सांगितले की, मोहनच्या मजुरीचे ५०० रुपये अजय महतो याच्याकडे बाकी होते. तो हे पैसे वारंवार मागत होता. त्याच वादामधून त्याच्या मित्रांनी त्याला पार्टी करण्यासाठी घरी बोलावले आणि शेतात नेऊन त्याची निर्घृणपणे हत्या केली.