सत्तास्थापनेच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2016 05:45 AM2016-05-21T05:45:18+5:302016-05-21T05:45:18+5:30

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर शुक्रवारी सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला

Governance movements | सत्तास्थापनेच्या हालचाली

सत्तास्थापनेच्या हालचाली

googlenewsNext


नवी दिल्ली : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर शुक्रवारी सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तामिळनाडू वगळता चारही राज्यांत नव्या नेत्याची निवड झाली आहे. आसाम आणि बंगालमधील शपथविधीचा मुहूर्तही ठरला आहे.
>ममता बॅनर्जी यांची निवड
कोलकात्यात तृणमूल काँग्रेसच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली. ममता यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्या बहुधा २७ मे रोजी शपथ घेतील. शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि गृहमंत्री राजनाथसिंह यांना निमंत्रित केले आहे.
>आसामात २४ मे रोजी शपथविधी
आसाममधील सर्वानंद सोनोवाल सरकारचा शपथविधी २४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुवाहाटीच्या खानपोरा मैदानावर होणार आहे. तत्पूर्वी २२ तारखेला भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, या वेळी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वानंद सोनोवाल यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात येईल.
>जयललितांनी
मानले आभार
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी निवडणुकीतील शानदार विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे धन्यवाद मानले आहेत. अण्णा द्रमुक विधिमंडळ पक्षाची बैठक कधी होणार हे जाहीर झाले नसले तरी जयललिताच पुन्हा मुख्यमंत्री होतील, हे उघड आहे.
>अच्युतानंदन
यांना संधी नाही
पिनराई विजयन हे केरळचे पुढील मुख्यमंत्री असतील. ७२ वर्षीय विजयन यांना मुख्यमंत्रिपदी आरूढ करण्याचा निर्णय सकाळी माकपा मुख्यालयात झाला. माकपाचे ९३ वर्षीय नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांना हा निर्णय कळल्यावर ते घरी परतले. माकपा सचिवालय व केरळ समितीची ही बैठक सीताराम येचुरी यांच्या उपस्थितीत पार पडली.
>जेलियांग
यांना अपेक्षा
नागालँडचे मुख्यमंत्री टी.आर. जेलियांग यांनी आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखालील नव्या भाजपा सरकारसोबत समन्वयाची अपेक्षा व्यक्त केली. आसाम हे राज्य नागालँडसाठी मोठ्या भावासमान आहे. दोघांचे अनेक समान मुद्दे आणि हित आहे. शेजाऱ्यांसोबत आमचे चांगले संबंध कायम राहतील, असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Governance movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.