जम्मू-काश्मीरमधील शस्रसंधी संपुष्टात, दहशतवाद्यांविरोधातील कारवाईस पुन्हा होणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 11:33 AM2018-06-17T11:33:24+5:302018-06-17T11:36:47+5:30
रमजानच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी संपुष्टात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
नवी दिल्ली - रमजानच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी संपुष्टात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रमजानच्या काळात एकतर्फी शस्त्रसंधी लागून केल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये कमालीची वाढ झाल्याने या निर्णयावर चौफेर टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने ही शस्त्रसंधी संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे.
The Government of India decides not to extend the suspension of operations in J&K announced in the beginning of Ramazan.
— HMO India (@HMOIndia) June 17, 2018
केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये रमजानच्या काळात लागू करण्यात आलेल्या शस्त्रसंधीला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाने ट्विटरवरून दिली आहे. त्यामुळे आता लष्कराला दहशवाद्यांविरोधात शोधमोहिमा राबवून कारवाई करता येणार आहे. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी दहशतवाद्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद आणि हिंसाचार मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
Security Forces are being directed to take all necessary actions as earlier to prevent terrorists from launching attacks&indulging in violence and killings.Government will continue with its endeavour to create an environment free of terror and violence in J&K:HM Rajnath Singh
— ANI (@ANI) June 17, 2018