सरकारी बँकांचं होणार विलीनीकरण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 11:48 AM2017-07-19T11:48:56+5:302017-07-19T12:11:30+5:30
सरकारी बँकांचं एकत्रिकरण करून त्यांची संख्या २१ वरून १२वर आणण्याचा विचारात केंद्र सरकार आहे
ऑनलाइन लोकमत
अदानी समूहाच्या इशा-यानंतर EPW च्या संपादकांचा राजीनामा
"कॉमर्स" शिकलेल्या तरुणानं "अॅग्रीकल्चर"मध्ये घडवलं करिअर
संसदेतील कॅन्टीनच्या जेवणात आढळला कोळी
सध्या अस्तित्वात असलेल्या २१ बँकांचं विलिनीकरण करून त्यांची संख्या १२ करण्याचा केंद्राचा विचार आहे. त्यानंतर तीन बँकांची एक बँक याप्रमाणे जागतिक दर्जाच्या चार बँकांच्या निर्मितीची योजना आहे. या नव्या बँका भारतीय स्टेट बँकेइतक्या मोठ्या असतील. या शिवाय पंजाब अँड सिंध बँक आणि आंध्र बँक या बँका स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे. शिवाय काही मध्यम आकाराच्या बँकांचेही स्वतंत्र अस्तित्व कायम राहील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँका आणि महिला बँकेचे एक एप्रिल २०१७ रोजी स्टेट बँकेत विलीनीकरण करण्यात आले होते. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया आदी बँकांकडून अधिग्रहणासाठी तयार असलेल्या बँकांचा शोध सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.