मलेरियाविरोधी हॅड्रोक्सी क्लोरोक्विन औषधीच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने सरकारची बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 02:42 AM2020-03-26T02:42:23+5:302020-03-26T06:08:25+5:30

आयसीएमआरने कोविड-१९ साठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाने शिफारस केलेल्या या उपचार पद्धतीला भारतीय औषधी महानियंत्रकांनी आपत्कालीन स्थितीत मर्यादित वापर करण्यास मंजुरी दिली आहे.

Government banned immediate effect on export of Hadroxy chloroquine drug against malaria | मलेरियाविरोधी हॅड्रोक्सी क्लोरोक्विन औषधीच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने सरकारची बंदी

मलेरियाविरोधी हॅड्रोक्सी क्लोरोक्विन औषधीच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने सरकारची बंदी

Next

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे भारत सरकारने देशांतर्गत बाजारात पुरेशा प्रमाणात औषधी उपलब्ध असाव्यात म्हणून मलेरियाविरोधी ‘हॅड्रोक्सी क्लोरोक्विन’ या औषधीच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे.
कोरोना संसर्गित आणि संशयित रुग्णांची देखभाल करणाऱ्या आरोग्यसेवेतील कर्मचारी संसर्गित रुग्णांच्या संपर्कातील लोकांवर उपचार करण्यासाठी हॅड्रोक्सी क्लोरोक्विन औषधीचा वापर करण्याची शिफारस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी सोमवारी केली होती.
आयसीएमआरने कोविड-१९ साठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाने शिफारस केलेल्या या उपचार पद्धतीला भारतीय औषधी महानियंत्रकांनी आपत्कालीन स्थितीत मर्यादित वापर करण्यास मंजुरी दिली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील विदेश व्यापार महासंचानालयाने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, हॅड्रोक्लोरोक्विन आणि आणि त्यापासून तयार करण्यात आलेल्या अन्य औषधीघटकांच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी घालण्यात आली आहे.
तथापि, सरकार विदेश मंत्रालयाच्या शिफारशीनुसार मानवतेच्या आधारावर या औषधीच्या निर्यातीला परवानगी देईल.
विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड)/ निर्यातभिमुख उद्योगांना आणि २५ मार्च २०२० रोजी किंवा त्याआधी अधिकृत परवान्यातहत निर्यातीची पूर्तता करण्यासाठी या औषधीच्या निर्यातीला परवानगी असेल, तसेच २५ मार्च २०२० रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेआधी जारी करण्यात आलेल्या हमीपत्राच्या प्रकरणात किंवा भारतातील निर्यातदारास आगाऊ रक्कम चुकती करण्यात आलेली आहे, अशा प्रकरणांत निर्यातीला परवानगी असेल. ही परवानगी कागदोपत्री पुराव्याच्या अधीन असेल, असे व्यापार महासंचानालयाने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोविड-१९ साठी मलेरियाविरोधी औषध प्रभावी असल्याचे सांगितल्यानंतर हॅड्रोक्सी क्लोरोक्विन आणि क्लोरोक्विन आणि संबंधित घटकयुक्त औषधीची मागणी वाढली आहे. मागील काही आठवड्यांपासून भारताने सॅनिटायझर्स, सर्व प्रकारचे व्हेन्टिलेटरर्स आणि सर्जिकल मास्कसह श्वासोच्छ्वास किंवा आॅक्सिजनथेरेपी किंवा श्वासप्रक्रिया उपकरणांच्या निर्यातीवर सरकारने मंगळवारी तात्काळ प्रभावाने बंदी घातली होती.
उपराष्ट्राध्यक्षही ट्रम्प यांना अनुकूल
हायड्रॉक्सी क्लोरोक्विन हे औषध कोरोनावर परिणामकारक ठरेल, असा ट्रम्प यांना विश्वास वाटत आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेंस यांनीही असेच उद्गार गेल्या आठवड्यात काढले होते. कोरोना संसर्गाची सदृश्य लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांनी क्लोरोक्विन औषध द्यायला हरकत नाही, असे पेंस यांनी सांगितले.

Web Title: Government banned immediate effect on export of Hadroxy chloroquine drug against malaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.