सरकारकडून मोफत लसीकरणाची तयारी सुरू; दिली ७४ कोटी कोरोना लसींच्या डोसची ऑर्डर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 07:15 PM2021-06-08T19:15:00+5:302021-06-08T19:16:33+5:30
Coronavirus Vaccine : कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या डोसेसची ऑर्डर देण्यात आल्याची केंद्राची माहिती. अॅडव्हान्स ऑर्डरसाठी ३० टक्के अॅडव्हान्स पेमेंट देणार.
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण केलं जाणार असल्याची घोषणा केली होती. तसंच आता याचा खर्च केंद्र सरकारच उचलणार असून कोणत्या राज्यांना किती लसींचे डोस दिले जातील याची माहिती आठवडाभरापूर्वीच देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर आता केंद्र सरकारनं तब्बल ७४ कोटी लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहे. नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
"काही राज्यांनी गेल्या महिन्यात लसींच्या डोसची खरेदी केंद्र सरकारमार्फत केली जावी असं म्हटलं होतं. सध्या कोविशिल्डच्या २५ कोटी आणि कोवॅक्सिनच्या १९ कोटी डोसेसची ऑर्डर कंपन्यांना देण्यात आली आहे. ही एक अॅडव्हान्स ऑर्डर आहे. यासाठी ३० टक्के अॅडव्हान्स पेमेंटही केलं जाईल. केंद्र सरकारनं एकूण ७४ कोटी अॅडव्हान्स डोसची ऑर्डर दिली आहे," असं पॉल म्हणाले. सप्टेंबर महिन्यापर्यंत काही बायोलॉजिकल लसी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी ३० कोटी डोसेसची ऑर्डरही देण्यात आल्याचं पॉल म्हणाले.
Govt has placed an order to purchase 25 crores doses of Covishield and 19 crore doses of Covaxin. Govt has also placed an order to purchase 30 crore doses of Biological E's vaccine, which will be available by September: Dr VK Paul, Member-Health, Niti Aayog pic.twitter.com/7fIV871lBO
— ANI (@ANI) June 8, 2021
मुलांसाठीच तिसरी लाट येईल याचा डेटा नाही -गुलेरिया
"चेन ऑफ ट्रान्समिशन रोखण्यासाठी कोविड अॅप्रोप्रियेट बिहेविअर ठेवावे लागेल. आता चिंता, तिसरी लाट केव्हा येणार अथवा येऊ शकते आणि ती मुलांसाठी किती घातक असेल? याची आहे. स्पॅनिश फ्लू, एच1 एन1 मध्येही अशाच लाटा दिसून आल्या होत्या. जेव्हा व्हायरसमध्ये बदल होतो, तेव्हा लाट दिसून येते," असं एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया म्हणाले. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे, की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा डेटा नाही. यामुळे ही लाट मुलांसाठी किती घात असेल? हे सांगणे अवघड असल्याचं त्यांनी नमूद केलं.