ATMमध्ये पैसे टाकण्याचे नियम सरकारने बदलले, जाणून घ्या नवे नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 03:55 PM2018-08-16T15:55:46+5:302018-08-16T17:31:41+5:30
ATMमध्ये पैसे टाकत असताना चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
नवी दिल्ली- ATMमध्ये पैसे टाकत असताना चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरकारनं ATMशी संबंधित नियम बदलले आहेत. या नियमांतर्गत रात्री 9 वाजल्यानंतर ATMमध्ये पैसे भरता येणार नाहीत. तसेच कॅशव्हॅनमधून एकाच वेळी 5 कोटींहून अधिक रक्कम घेऊन जाता येणार नाही.
त्याप्रमाणेच कॅशव्हॅनची सुरक्षा करणा-या कर्मचा-यांना चोरांपासून बचाव करण्याचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. ग्रामीण भागासाठी प्रायोगिक तत्त्वावर हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, पैशांची वाहतूक करण्यासाठी कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना त्यांच्या आधारची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. ग्रामीण भागात संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ATMमध्ये कॅश भरण्यात येणार नाही.
ATM व्हॅनमध्ये असणार या नव्या सुविधा
सर्व कॅशव्हॅनमध्ये GSMवर आधारित ऑटो डायलर, सिक्युरिटी अलार्म आणि मोटराइज्ड सायरन बसवण्यात येणार आहेत. SISके मॅनेजिंग डायरेक्टर आणि फिक्कीची खासगी सिक्युरिटीचे अध्यक्ष रितुराज सिन्हा म्हणाले, हा नक्कीच इंडस्ट्रीचा बदलवणारा नियम आहे. आम्ही अनेक दिवसांपासून याची वाट पाहत होतो. या नियमांमुळे लॉजिस्टिक्स सेगमेंट सुरक्षित करण्यास मदत होणार आहे. कॅशव्हॅनमध्ये सीसीटीव्ही, लाइव्ह जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम आणि बंदुकांसह सिक्युरिटी गार्ड तैनात राहणार आहेत. सिक्युरिटी गार्डच्या बंदुकीतून दोन वर्षांतून कमीत कमी एकदा टेस्ट फायरिंग केली जाणार आहे. तसेच बुलेट प्रत्येक दोन वर्षांनी बदलण्यात येणार आहे. CCTVच्या माध्यमातून चोरांवर नजर ठेवली जाणार आहे.