आयुर्वेदाच्या प्रचार - प्रसारासाठी सरकार कटिबद्ध

By Admin | Published: February 2, 2016 01:21 PM2016-02-02T13:21:03+5:302016-02-02T13:21:03+5:30

केंद्र सरकारने स्वतंत्र आयुर्वेद मंत्रालय स्थापले असून आयुर्वेदाच्या प्रचारा व प्रसारासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली

Government committed to promote Ayurveda | आयुर्वेदाच्या प्रचार - प्रसारासाठी सरकार कटिबद्ध

आयुर्वेदाच्या प्रचार - प्रसारासाठी सरकार कटिबद्ध

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
कोझिकोडे (केरळ), दि. २ - केंद्र सरकारने स्वतंत्र आयुर्वेद मंत्रालय स्थापले असून आयुर्वेदाच्या प्रचारा व प्रसारासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. मंगळवारी सकाळी आयोजित केलेल्या ग्लोबल आयुर्वेद फेस्टिवलमध्ये ते बोलत होते. 
पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
 
- आयुर्वेद व योगाचा भारताला खूप दीर्घ व समृद्ध असा इतिहास आहे. 
आयुर्वेदामध्ये असलेले ज्ञान, माहिती व तंत्रज्ञान याचा एकमेकांना कसा लाभ घेता येईल, त्याची देवाणघेवाण कशी करता येईल यासाठी संस्थात्मक उभारणी करण्याचा सरकारचा विचार आहे.
- अन्य देशांच्या अनुभवातून आम्ही शिकू आणि आयुर्वेद व अन्य भारतीय उपचार पद्धतींचा प्रसार कसा करता येईल याचा अभ्यास करू.
- पारंपरिक औषधे ग्रामीण भागातल्या लोकांना परवडतात, जी स्थानिक पातळीवर उपलब्ध असतात आणि ती वर्षानुवर्षे प्रचलित असल्यामुळे सुरक्षितही असतात.
- केवळ आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये या दिशेने आयुर्वेदाचा कसा वापर केला जाऊ शकतो या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- वैद्यकीय उपचारांवर होणारा वाढता खर्च आणि औषधांचे होणारे दुष्परिणाम बघता वैद्यकक्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तिही पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाच्या समावेशाचा विचार करत आहेत.
- केवळ आरोग्य सुविधा देण्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागेल आणि सुदृढ आरोग्य राखण्यासाठी  शारिरीक तसेच मानसिक अशा दोन्ही दृष्टीने निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा लागेल.
- विवेकानंदांच्या शब्दात सांगायचं तर पौर्वात्य व पाश्चिमात्य अशा दोन्ही संस्कृतीमधलं सर्वोत्तम त्याचा संगम करण्याचा आपला प्रयत्न असेल.
- आयुष निर्माणित औषधांच्या दर्जामध्ये नियंत्रण राखण्यासाठी पावले उचलण्यात येत असून त्यादृष्टीने नियंत्रणव्यवस्थेत सुधारणा आणि अमलबजावणी करण्यात येत आहे.
- भारतात संतमहात्म्यांची थोर परंपरा असून त्यांनी आरोग्यसंवर्धनाच्या भारतीय पद्धती विकसित केल्या.

Web Title: Government committed to promote Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.