सरकार जवानांच्या रक्ताची दलाली करत आहे- राहुल गांधी
By Admin | Published: October 6, 2016 07:46 PM2016-10-06T19:46:17+5:302016-10-06T20:18:26+5:30
केंद्रातील भाजप सरकार हे जवानांच्या रक्ताची दलाली करत आहे, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - केंद्रातील भाजप सरकार हे जवानांच्या रक्ताची दलाली करत आहे, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करत आहे. सर्जिकल स्ट्राइक करून लष्करानं स्वतःचं काम केलं. पण त्याचं श्रेय घेण्याचा भाजपानं प्रयत्न करू नये, असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
"आमच्या सरकारनं लोकांना न्याय मिळवून दिला. नरेंद्र मोदी लोकांना पैसे वाटत असताना शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतक-यांना योग्य भाव मिळवून देण्याचं वचन तुम्ही पाळलं नाहीत. स्वामिनाथन रिपोर्ट लागू करीन असं सांगितल असतानाही तो रिपोर्ट लागू केला नाही. 2 हजार कोटी युवकांना रोजगार उपलब्ध देणारं ते वचनही पाळलं नाहीत. मात्र एका भारतीयाला दुस-या भारतीयाशी लढवण्याचं काम तुम्ही नक्कीच केलं आहात, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
"भारताला हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाटण्याचं काम तुम्ही केलं असून, उत्तर प्रदेशमध्ये हिंदू-मुस्लिमांची तुम्ही लढाई लावून देत आहात", असा आरोप राहुल गांधींनी मोदी सरकारवर केला आहे.
WATCH: You are doing 'Dalali' of their(Jawans) blood: Rahul Gandhi to PM Modi pic.twitter.com/9FyidaF6uj
— ANI (@ANI_news) October 6, 2016