स्वदेशी सहा आण्विक पाणबुड्यांना मंजुरी सरकारचा निर्णय : सात स्टिल्थ युद्धनौकांची निर्मितीही करणार
By admin | Published: February 18, 2015 11:53 PM2015-02-18T23:53:57+5:302015-02-18T23:53:57+5:30
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नौदलाला सक्षम करण्याकडे दमदार पाऊल टाकताना स्वदेशी सहा आण्विक पाणबुड्यांसह सात स्टिल्थ(रडारची नजर चुकवणाऱ्या) युद्धनौकांच्या निर्मितीला हिरवी झेंडी दाखविली आहे.
Next
न ी दिल्ली : केंद्र सरकारने नौदलाला सक्षम करण्याकडे दमदार पाऊल टाकताना स्वदेशी सहा आण्विक पाणबुड्यांसह सात स्टिल्थ(रडारची नजर चुकवणाऱ्या) युद्धनौकांच्या निर्मितीला हिरवी झेंडी दाखविली आहे.संपूर्ण भारतीय सागरी हद्दीत विशेषत: सामरिक डावपेचांच्यादृष्टीने मोक्याच्या अशा पर्शियन आखात ते मलाक्का पट्ट्यांपर्यंत एकूणच प्रतिकार क्षमता बळकट करण्याच्या उद्देशाने सुरक्षेसंबंधी मंत्रिमंडळ समितीने(सीसीएस) हा निर्णय घेतला आहे. मुंबईतील माझगाव गोदीत ५० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्प-१७ ए अंतर्गत चार स्टिल्थ युद्धनौकांची तर कोलकात्याच्या गार्डन रिच जहाजबांधणी आणि अभियांत्रिकी केंद्रात तीन युद्धनौकांची निर्मिती केली जाईल. एमडीएल आणि जीआरएसईदरम्यान या महिन्यात करारावर स्वाक्षरी केली जाणार असून त्यासाठी प्रारंभी चार हजार कोटींची रक्कम दिली जाईल.या दोन्ही गोदींमध्ये प्रकल्पाच्या कामांना गती देण्यात आली आहे. माझगाव गोदीत यापूर्वी आयएनएस शिवालिक, आयएनएस सातपुडा आणि आयएनएस सह्याद्री या ६,१०० टन वजनाच्या युद्धनौकांची निर्मिती करण्यात आली असून २०१०-१२ या काळात त्यांचा नौदलात समावेश करण्यात आला आहे.---------------------नव्या युद्धनौका अधिक वेगवाननव्या बहुउद्देशीय युद्धनौका ह्या आकाराने मोठ्या, अधिक वेगवान आणि गनिमी डावपेचांमध्ये त्या शिवालिकपेक्षा अधिक सरस राहतील. त्यांच्यावर अधिक शस्त्रे आणि सेन्सर्स लावण्यात येणार असून त्यांची वातावरणातील विविध प्रकारच्या संकटांना तोंड देण्याची क्षमता असेल, तथापि या सात युद्धनौकांच्या बांधणीसाठी एक दशकाचा कालावधी लागू शकतो, असे सूत्रांनी म्हटले.