दिल्ली सरकार स्कायवॉकद्वारे कुतूब मिनारला मेट्रोशी जोडणार
By admin | Published: March 29, 2016 06:07 PM2016-03-29T18:07:47+5:302016-03-29T18:07:47+5:30
ऐतिहासिक वास्तू कुतूब मिनारला भेट देणा-या पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी दिल्ली सरकारने कुतूब मिनारला मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २९ - ऐतिहासिक वास्तू कुतूब मिनारला भेट देणा-या पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी दिल्ली सरकारने कुतूब मिनारला मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पर्यटन वाढवण्याच्या हेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली सरकारने पर्यटनवाढीसाठी 10 करोडोंची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत स्कायवॉकचे बांधकाम केले जाणार आहे. महत्वाचं म्हणजे कुतूब मिनारची नोंद युनेस्को वर्ल्डमधील ऐतिहासिक वास्तूंमध्ये आहे.