सरकारी कर्मचा-यांच्या पगारात होणार १५% वाढ?
By admin | Published: November 17, 2015 07:27 PM2015-11-17T19:27:26+5:302015-11-17T19:38:15+5:30
सातवा केंद्रीय वेतन आयोगाचा लवकरच सादर होणार असून तो मंजूर झाल्यास सरकारी कर्मचा-यांच्या वेतनात १५ टक्क्यांची वाढ होईल.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - सातव्या वेतन आयोगाचा अहवाल केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासमोर लवकरच सादर करण्यात येणार असून त्यामुळे सरकारी कर्मचा-यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने हा अहवाल मंजूर केल्यास सरकारी कर्मचा-यांच्या वेतनात तब्बल १५ टक्क्यांची वाढ होणार आहे.
येत्या १९ अथवा २० नोव्हेंबर रोजी सातव्या वेतन आयोगाचा अहवाल सादर होणार असून त्यात सरकारी कर्मचा-यांच्या पगारात १५ टक्के वाढीची शिफारस करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने हा अहवाल मंजूर केल्यास नवीन वर्षांपासून म्हणजेच १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू होईल आणि सरकारी कर्मचा-यांच्या वेतनात १५ टक्के वाढ होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयामुळे ५० लाखांहून अधिक सरकारी कर्म-यांना फायदा होईल.
दरम्यान सातव्या वेतन आयोगाता निवृत्तीच्या वयात बदल करण्याबाबत कोणतीही शिफारर नसल्याचे समजते.