सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांचा आज संप
By admin | Published: July 29, 2016 05:02 AM2016-07-29T05:02:47+5:302016-07-29T05:02:47+5:30
असोसिएट बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण तसेच बँकिंग क्षेत्रातील सुधारणा यांना विरोध करण्यासाठी सरकारी बँकांचे कर्मचारी शुक्रवारी एका दिवसाचा संप करणार आहेत.
नवी दिल्ली : असोसिएट बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण तसेच बँकिंग क्षेत्रातील सुधारणा यांना विरोध करण्यासाठी सरकारी बँकांचे कर्मचारी शुक्रवारी एका दिवसाचा संप करणार आहेत. त्यामुळे देशातील बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
युनायटेड फोरम आॅफ बँकस् युनियन (यूएफबीयू) या शिखर संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप होणार आहे. या संघटनेत देशभरातील ९ बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटना सहभागी आहेत. या संघटनांचे ८ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी सदस्य आहेत. या संपामुळे बँकांच्या चेक क्लीअरन्स, पैसे भरणे, पैसे काढणे यासारख्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मुख्य कामगार आयुक्तांसोबत २६ जुलै रोजी समेटाची बैठक झाली. तथापि, ती निष्फळ ठरली. मागण्यांवर विचार झाल्यास संपाचा फेरविचार करण्याची यूएफबीयूची तयारी होती. तथापि, सरकारकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद आला नाही. सरकार आपल्या निर्णयाचे समर्थन करीत राहिले. त्यामुळे संप अटळ ठरला.
- सी.एच. वेंकटचलम, सरचिटणीस,
आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन