CoronaVirus News: सीरमच्या कोविशील्डबद्दल मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार; लसीकरणावर थेट परिणाम होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 03:25 PM2021-05-07T15:25:09+5:302021-05-07T15:27:34+5:30
CoronaVirus News: तज्ज्ञांच्या समितीकडून विचार सुरू; पुढील आठवड्यात मोठा निर्णय अपेक्षित
नवी दिल्ली: कोरोना संकट काळात लसीसंदर्भात जगभरात संशोधन सुरू आहे. कोरोना लसींच्या वापराबद्दल संशोधनानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकार ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांची एक समिती सध्या यावर विचार करत आहे. कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवल्यास लसीचा प्रभाव आणखी वाढतो, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे समिती दोन डोसमधील अंतर वाढवण्याच्या विचारात असून याबद्दलचा निर्णय पुढील आठवड्यात होऊ शकतो.
तुमची फुफ्फुसं किती सक्षम?; घरच्याघरी तपासून पाहण्यासाठी वापरा सोपी ट्रिक
ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकानं तयार केलेल्या कोरोना लसीचं उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून करण्यात येतं. ही लस कोविशील्ड नावानं उपलब्ध आहे. सीरमनं एप्रिल महिन्यात कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ४ ते ६ आठवड्यांवरून ६ ते ८ आठवडे इतकं केलं. त्याआधी मार्च महिन्यात लॅन्सेटनं एक अहवाल प्रसिद्द केला होता. कोविशील्डच्या दोन डोसमध्ये १२ आठवड्यांचं अंतर ठेवल्यास लस अधिक प्रभावी ठरते, अशी माहिती या अहवालात होती.
कोरोनाचा कहर सुरू असताना चीननं मोठा निर्णय घेतला; संपूर्ण जगालाच बसणार फटका?
लसीच्या दोन डोसमधील अंतरावरून ती कितपत प्रभावी ठरणार ही बाब निश्चित होते. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमध्ये सहा आठवड्यांपेक्षा कमी अंतर असल्यास ती ५५.१ टक्के प्रभावी ठरते. तर दोन डोसमध्ये १२ आठवड्यांचं अंतर ठेवल्यास तिचा प्रभाव ८१.३ टक्के असतो. ब्राझील आणि ब्रिटनमध्ये झालेल्या संशोधनतून समोर आलेली आकडेवारी मात्र वेगळी आहे. या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये किमान एका महिन्याचं अंतर ठेवल्यास लसीचा प्रभाव ९० टक्के असतो.