सरकार तपासणार ट्रकचालकांचे डोळे, आजपासून मोफत शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:34 AM2017-10-02T02:34:00+5:302017-10-02T02:34:08+5:30

रस्ते अपघातांना तातडीने रोखण्यासाठी सरकार ट्रकचालकांच्या डोळ््यांची तपासणी करण्याची योजना बनवित आहे. यासाठी देशभर राष्ट्रीय महामार्गांवर मोफत तपासणी शिबिरे घेतली जातील.

Government eyes shutter truck drivers, free camp today | सरकार तपासणार ट्रकचालकांचे डोळे, आजपासून मोफत शिबिर

सरकार तपासणार ट्रकचालकांचे डोळे, आजपासून मोफत शिबिर

Next

नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : रस्ते अपघातांना तातडीने रोखण्यासाठी सरकार ट्रकचालकांच्या डोळ््यांची तपासणी करण्याची योजना बनवित आहे. यासाठी देशभर राष्ट्रीय महामार्गांवर मोफत तपासणी शिबिरे घेतली जातील. महात्मा गांधी जयंतीनिमित्त (२ आॅक्टोबर) रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे नागपूरमधील पंजारी टोलप्लाझावर शिबिराला प्रारंभ करतील.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग तयार करणाºया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून २ ते ६ आॅक्टोबर दरम्यान ही विनामूल्य शिबिरे घेतली जातील. ट्रकचालकांसोबत क्लीनरच्या डोळ््यांचीही तपासणी केली जाईल, गरज भासल्यास त्यांना चष्माही मोफत दिला जाईल. याशिवाय नेत्रतज्ज्ञांकडून औषधे आणि इतर आवश्यक सल्ला दिला जाईल. ही शिबिरे वेगवेगळ््या राष्ट्रीय महामार्गांवर ५० ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावले जातील. ही शिबिरे अशासकीय संस्थांच्या मदतीने असतील व त्यांचे संचालन नेत्र विशेषज्ज्ञ व त्यांच्या सहकार्यांकडून केले जाईल. शिबिरांच्या ठिकाणी स्वच्छतागृह (शौचालय), हात धुण्याची सोय व पेय पदार्थांची व्हेंडिंग मशिन असेल. त्याच वेळी ५० ट्रक्सच्या पार्किंगची सोयही तेथे असेल.
सरकार सदोष दृष्टी ही रस्ते अपघातांचे मोठे कारण समजते. चालकांच्या डोळ््यांची तपासणी व आवश्यक त्या उपाययोजनांमुळे अपघात कमी करता येऊ शकतील, असे सरकारला वाटते. गेल्या एक वर्षात देशात रस्ते अपघातांचे प्रमाण थोडेसे खाली आले आहे. तरीही वर्षभर दीड लाखांपेक्षा जास्त लोकांचा यात मृत्यू होतो. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी चार लाख ८० हजार ६५२ रस्ते अपघात झाले व त्यात एक लाख ५० हजार ७८५ लोक मरण पावले, तर चार लाख ९४ हजार ६२४ लोक जखमी झाले.

महाराष्ट्रात भलेही जास्त संख्येने रस्ते अपघात होतात, तरी गेल्या एक वर्षात २४ हजार अपघात कमी झाले आहेत.
२०१५ मध्ये ६३ हजार ८०५ अपघात
झाले होते, तर २०१६ मध्ये ३९ हजार ८५७. अपघातांत मरण पावलेल्यांची संख्या व जखमींची संख्याही कमी झाली आहे, परंतु अपघातांच्या घटलेल्या संख्येच्या तुलनेत ही संख्या फारच कमी आहे. २०१५ मध्ये राज्यात १३ हजार २१२ लोक मरण पावले होते, तर
२०१६ मध्ये १२ हजार ९३५.

Web Title: Government eyes shutter truck drivers, free camp today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात