रोजगार निर्मितीत सरकार पूर्णपणे अपयशी - राहुल गांधी
By admin | Published: January 31, 2017 01:33 PM2017-01-31T13:33:20+5:302017-01-31T13:36:56+5:30
रोजगार निर्मितीमध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - रोजगार निर्मितीमध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर हल्लाबोल चढवला. आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे अभिभाषण करत सरकारने राबवलेल्या विविध योजना, धोरणांचा आढावा घेतला. तसेच नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक या मुद्यांचाही उल्लेख करत सरकारचे कौतुक केले.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ' तरूणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे हा सध्या देशाला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. मात्र सरकार यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे' अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान गरीब, दलित, शोषित, शेतकरी आणि श्रमिक वर्ग सरकारच्या धोरणात अग्रस्थानी असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी आपल्या अभिभाषणात नमूद केले.
उद्या, १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरूण जेटली केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असून रेल्वेचा अर्थसंकल्पही उद्याच मांडण्यात येणार आहे.
Government is a complete failure in job creation, this is my main point: Rahul Gandhi pic.twitter.com/VQ3nBzNnm9
— ANI (@ANI_news) 31 January 2017
Biggest problem with the govt is that they are doing nothing for job creation- Rahul Gandhi, Congress vice President
— ANI (@ANI_news) 31 January 2017