दुष्काऴग्रस्त शेतक-यांच्या मुलीच्या लग्नासाठी सरकारी निधी

By admin | Published: December 26, 2015 08:09 PM2015-12-26T20:09:25+5:302015-12-26T20:09:25+5:30

दुष्काऴग्रस्त शेतक-यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत म्हणून छत्तीसगड सरकारने ३०००० रुपयांचा निधी

Government fund for marriage of drought-hit farmers | दुष्काऴग्रस्त शेतक-यांच्या मुलीच्या लग्नासाठी सरकारी निधी

दुष्काऴग्रस्त शेतक-यांच्या मुलीच्या लग्नासाठी सरकारी निधी

Next
>ऑनलाइन लोकमत,
रायपूर, दि. २६ - दुष्काऴग्रस्त शेतक-यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत म्हणून छत्तीसगड सरकारने ३०००० रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 
सरकारच्या मुख्यमंत्री कन्या विवाह योजणेच्या माध्यमातून देण्यात येणा-या निधीत वाढ करण्यात आली असून १५००० रुपयांवरुन ३०००० रुपये करण्यात आली आहे. हा निधी यंदाच्या दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मुलींच्या लग्नासाठी देण्यात येणार असल्याची माहिती एका सरकारी प्रवक्ताने दिली. 
राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत हा निधी थेट दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान येत्या वर्षात या योजनेत सुधारणा करण्यात येणार असल्याचेही या प्रवक्ताने सांगितले.  

Web Title: Government fund for marriage of drought-hit farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.