14 वर्षाच्या मुलासोबत गुजरात सरकारने केला ड्रोन निर्मितीचा करार

By admin | Published: January 13, 2017 11:12 AM2017-01-13T11:12:53+5:302017-01-13T11:22:39+5:30

दरवर्षी आयोजित होणा-या वायब्रंट गुजरात जागतिक परिषदेत अनेक बडया कंपन्या आणि गुजरात सरकारमध्ये करार होतात.

The Government of Gujarat has signed a drone production agreement with a 14-year-old boy | 14 वर्षाच्या मुलासोबत गुजरात सरकारने केला ड्रोन निर्मितीचा करार

14 वर्षाच्या मुलासोबत गुजरात सरकारने केला ड्रोन निर्मितीचा करार

Next

 ऑनलाइन लोकमत 

अहमदाबाद, दि. 13 - दरवर्षी आयोजित होणा-या वायब्रंट गुजरात जागतिक परिषदेत अनेक बडया कंपन्या आणि गुजरात सरकारमध्ये करार होतात. यावर्षी वायब्रंट गुजरातमध्ये एक अनोखी घटना घडली. ज्याची सर्वत्र चर्चा आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या एका 14 वर्षाच्या मुलाने गुजरात सरकारबरोबर ड्रोन निर्मितीचा तब्बल 5 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे. 
 
हर्षवर्धन झाला असे या मुलाचे नाव आहे. गुजरात सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने त्याच्यासोबत ड्रोन निर्मितीचा करार केला आहे. हर्षवर्धन युद्धभूमीवर शत्रूने पेरलेली भूसुरुंग शोधून ती निकामी करणारे ड्रोन विकसित करणार आहे. आपल्या बिझनेस प्लानसह सहभागी झालेल्या हर्षवर्धनने ड्रोनचे तीन नमूने बनवले होते. 
 
हर्षवर्धन 10 व्या इयत्तेत असून त्याच्या वयाची मुले दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेची तयारी करत आहेत. भुसुरुंग निकामी करणा-या ड्रोन प्रकल्पावर हर्षवर्धनने 2016 पासून काम सुरु केले. हाताने भुसुरुंग निकामी करताना जवानांचा मृत्यू होतो ते जखमी होत असल्याचे मी टीव्हीवर पाहिले होते. त्यावेळी मला अशा प्रकारचे ड्रोन विकसित करण्याची कल्पना सुचली असे हर्षवर्धनने सांगितले. 
 
हर्षवर्धनने बनवलेल्य़ा तीन ड्रोनसाठी पाच लाखाचा खर्च आला. पहिल्या दोन नमुन्यांसाठी पालकांनी त्याला 2 लाख रुपये दिले. त्यानंतर 3 लाख रुपये त्याला सरकारने दिले.  
 

Web Title: The Government of Gujarat has signed a drone production agreement with a 14-year-old boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.