सरकारी वेबसाइट हॅक करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 05:34 AM2018-04-29T05:34:54+5:302018-04-29T05:34:54+5:30

पाकिस्तानच्या ‘आयएसआय’च्या पाठिंब्याने भारतात सरकारी वेबसाइट हॅक करणा-या आणि समाजमाध्यमांतून द्वेष व तिरस्काराचा प्रसार करून, देशविरोधी

Government hackers arrested two people | सरकारी वेबसाइट हॅक करणाऱ्या दोघांना अटक

सरकारी वेबसाइट हॅक करणाऱ्या दोघांना अटक

Next

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ‘आयएसआय’च्या पाठिंब्याने भारतात सरकारी वेबसाइट हॅक करणा-या आणि समाजमाध्यमांतून द्वेष व तिरस्काराचा प्रसार करून, देशविरोधी भावना चेतविणा-या हॅकर्सच्या एका गटाचे कारस्थान दिल्ली पोलिसांनी उघड केले आहे. हॅकर्सना शोधून काढण्याची ही पहिलीच कारवाई असून, त्यात पंजाबमध्ये शिकणाºया दोन काश्मिरी तरुणांना अटक झाली आहे.
शाहीद मल्ला व अदिल हुसैन तेली अशी त्यांची नावे असून इतरांचा शोध सुरू आहे. शाहीद बारामुल्लाचा असून बी.टेकच्या दुसºया वर्षात शिकत आहे, तर अनंतनागचा अदिल बीसीएचा विद्यार्थी आहे. ‘टीम हॅकर्स थर्ड आय’ या देशविरोधी हॅकर गटाचे ते सदस्य आहेत. या गटाने जानेवारीत जे अ‍ॅण्ड के बँकेसह ५०० सरकारी वेबसाइट हॅक केल्याचा संशय आहे.
या गटाचा पाकच्या ‘आयएसआय’ हस्तकांशीही साटेलोटे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लाहोर व दुबईतून काम करणाºया ‘पाक सायबर अ‍ॅटॅकर’ या गटातील फैजल अफजल व आमिर मुजफ्फर यांच्यावर पोलिसांचा संशय आहे. गेल्या दोन वर्षांत या गटाने हजारो भारतीय बेवसाइट हॅक केल्या आहेत. या गटाची माहिती लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस उपायुक्त के. पी. एस. मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Government hackers arrested two people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.