पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाण पुलाबाबत शासनाने मनपाकडून मागविला अहवाल

By admin | Published: March 15, 2016 12:34 AM2016-03-15T00:34:06+5:302016-03-15T00:34:06+5:30

जळगाव: खासदार ए.टी. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जिल्‘ातील चार रेल्वे उड्डाण पुलांसाठी पन्नास टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविली असून राज्यशासनाने उर्वरीत ५० टक्के खर्च करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार खासदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने मनपा हद्दीतील पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाणपुलांबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला आहे. याबाबतचे पत्र सोमवारी मनपाला प्राप्त झाले.

Government has asked for a report about Pimprala and Asoaadha railway bridge | पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाण पुलाबाबत शासनाने मनपाकडून मागविला अहवाल

पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाण पुलाबाबत शासनाने मनपाकडून मागविला अहवाल

Next
गाव: खासदार ए.टी. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जिल्‘ातील चार रेल्वे उड्डाण पुलांसाठी पन्नास टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविली असून राज्यशासनाने उर्वरीत ५० टक्के खर्च करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार खासदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने मनपा हद्दीतील पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाणपुलांबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला आहे. याबाबतचे पत्र सोमवारी मनपाला प्राप्त झाले.
शहरातील रेल्वे उड्डाण पुलांसाठी मनपाकडून पाठपुरावा सुरू होता. खासदार ए.टी. पाटील यांनी मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने रेल्वेच्या निधीतून या रेल्वे उड्डाण पुलांचे काम करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन तत्कालीन महापौर राखी सोनवणे व उपमहापौर सुनील महाजन यांना दिले होते. त्यानुसार मनपाची विशेष सभा बोलवून या उड्डाणपुलांसाठीचा ठरावही करून देण्यात आला होता. त्याअनुषंगाने केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल व असोदा रेल्वे उड्डापुलाचे तसेच जिल्‘ातील कजगाव ता.भडगाव या रेल्वे उडडाणपुलांच्या कामांना मंजुरी देत निम्मा खर्च रेल्वे मंत्रालय करेल. उर्वरित खर्च राज्य शासनाने करावा, असे कळविले होते. त्यानुसार खासदार ए.टी. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ८ जून २०१५ रोजी पत्र देऊन हा५० टक्के खर्च राज्य शासनाने उचलण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शासनाने कार्यवाही सुरू केली आहे. त्याअनुषंगाने शासनाकडून मनपाला शहराच्या हद्दीतील पिंप्राळा व असोदा रेल्वे उड्डाणपुलांबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Government has asked for a report about Pimprala and Asoaadha railway bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.