आधार कार्डला सरकार घटनात्मक दर्जा देणार

By admin | Published: February 29, 2016 01:20 PM2016-02-29T13:20:27+5:302016-02-29T13:32:44+5:30

सरकारने गरजुंसाठी सुरु केलेल्या सुविधांचा फायदा त्यांना घेता यावा यासाठी सरकार आधार कार्डला घटनात्मक दर्जा देणार आहे

The government has given constitutional status to Aadhar card | आधार कार्डला सरकार घटनात्मक दर्जा देणार

आधार कार्डला सरकार घटनात्मक दर्जा देणार

Next
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २९ - सरकारने गरजुंसाठी सुरु केलेल्या सुविधांचा फायदा त्यांना घेता यावा यासाठी सरकार आधार कार्डला घटनात्मक दर्जा देणार आहे. जेणेकरुन ही मदत दुस-या कोणाला न मिळता सरळ थेट त्या व्यक्तीला मिळेल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेट मांडताना दिली आहे. गरजू लोकांसाठी सुरु केलेल्या योजनांचा लाभ त्यांना घेता यावा यासाठी सरकार काही पावल उचलणार आहे. यासाठी कायदा बनवण्याचादेखील सरकार विचार करत आहे जिथे आधार कार्डला घटनात्मक दर्जा दिला जाईल. आधार कार्डाद्वारे आर्थिक मदत आणि वितरण बंधनकारक केल्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी होईल असंदेखील अरुण जेटली यांनी सांगितलं आहे. आधार कार्डला घटनात्मक दर्जा दिल्याने त्याला कायदेशीर सुरक्षा मिळेल सोबतच विकासाच्या दृष्टीनेही त्याचा फायदा होईल असा विश्वास अरुण जेटलींनी व्यक्त केला आहे. 
 

 

Web Title: The government has given constitutional status to Aadhar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.