Petrol-Diesel Price : मोदी सरकारकडून 'दिवाळी गिफ्ट'; उद्यापासून पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 08:22 PM2021-11-03T20:22:20+5:302021-11-03T20:22:59+5:30
Petrol Diesel Price Reduced : केंद्राकडून उत्पादन शुल्कात घट. सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा.
Petrol-Diesel Price Reduced : गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. देशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांच्या पुढे गेले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर हे ५ रूपयांनी तर डिझेलचे दर हे १० रूपयांनी कमी होणार आहेत.
केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पेट्रोलचे दर ५ रूपयांनी आणि डिझेलचे दर १० रूपयांनी कमी होणार आहेत. नवे दर गुरूवार पासून लागू होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे महागाईनं त्रस्त झालेल्या देशवासीयांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्रानं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील वॅट कमी करावा असं आवाहन अर्थ मंत्रालयाद्वारे करण्यात आलं आहे.
On eve of #Diwali, Government of India announces excise duty reduction on petrol and diesel. Excise duty on Petrol and Diesel to be reduced by Rs 5 and Rs 10 respectively from tomorrow pic.twitter.com/peYP1fA4gO
— ANI (@ANI) November 3, 2021
Govt of India has taken a significant decision of reducing central excise duty on petrol & diesel by Rs 5 & Rs 10 respectively from tomorrow... States are also urged to commensurately reduce VAT on petrol & diesel to give relief to consumers: Finance Ministry pic.twitter.com/eIFSk3W8y1
— ANI (@ANI) November 3, 2021
गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेली पेट्रोल डिझेलची दरवाढ दिवाळीच्या तोंडावर बुधवारी थांबली होती. यापूर्वी पेट्रोलच्या दरात सलग ७ दिवस तर डिझेलच्या दरात सहा दिवस ३५-३५ पैशांची वाढ करण्यात आली होती. मंगळवारी पेट्रोलच्या किंमतीत ३५ पैशांची वाढ करण्यात आली होती. परंतु डिझेलच्या किंमतीत वाढ झाली नव्हती. दिल्लीत बुधवारी पेट्रोलचे दर ११०.०४ रूपये तर डिझेलचे दर ९८.४२ रूपये प्रति लीटर इतके होते.
दरम्यान, गुरूवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर ११५.८५ रुपयावर स्थिर होता. तर दिल्लीत पेट्रोल ११०.०४ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०६.६६ रुपये, कोलकात्यात एक ११०.४९ रुपये तर भोपाळमध्ये आज पेट्रोलचे दर ११८.८३ रुपये इतके होते. तर दुसरीकडे मुंबईत डिझेलचा दर १०६.६२ रुपये इतका होता.