रहस्यमयी बियाणांमुळे भारतात खळबळ , तस्करीबाबत सरकारने जारी केला रेड अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 03:45 AM2020-09-03T03:45:27+5:302020-09-03T03:45:59+5:30
अशा प्रकारची रहस्यमयी बियाणे पर्यावरण, कृषी व इको सिस्टीमला धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकारच्या कृषीविषयक तस्करीमुळे राष्टÑीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या कृषी उत्पादनाला धोका ठरणाऱ्या रहस्यमय बियाणांबद्दल भारतासह जगभरातील शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये अशी बियाणे जहाजांद्वारे पोहोचवली जात असून, त्याबाबत सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे याबाबत इशारा जारी करण्यात आला आहे. कृषी मंत्रालयाचे उपायुक्त (गुणवत्ता नियंत्रक) डॉ. दिलीपकुमार श्रीवास्तव यांच्या सहीनिशी जारी झालेल्या पत्रात म्हटले आहे की, अशा प्रकारची रहस्यमयी बियाणे पर्यावरण, कृषी व इको सिस्टीमला धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकारच्या कृषीविषयक तस्करीमुळे राष्टÑीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. देशातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी अशा बियांबाबत सतर्क राहायला हवे. अशा प्रकारच्या बियाणांमधून विविध रोग पसरवण्याचाही कट असू शकतो.
‘लोकमत’ने डॉ. श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेश, कृषी विद्यापीठे, संघटना, संबंधित यंत्रणा, आयसीएआर व बियाणे महामंडळांना याबाबत सतर्क करण्यात आले असल्याचे सांगितले. अशा बिया देशातील जैैवविविधतेला धोका ठरू शकतात, असेही सांगण्यात आले आहे.
भारताच्या कृषी खात्याने ६ आॅगस्ट रोजी जारी केलेल्या या इशाºयाने खळबळ उडवून दिली आहे.
पार्सलमधून बिया
अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंड, जपान व काही युरोपियन देशांमध्ये अशा प्रकारच्या बिया मोठ्या प्रमाणावर जहाजे/पार्सलमधून पोहोचल्या आहेत. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
स्वीत्झर्लंडस्थित आंतरराष्टÑीय बियाणे फेडरेशनने म्हटले आहे की, भारत जागतिक करारात सहभागी असल्यामुळे भारतालाही याबाबत सतर्क करण्यात येत आहे. अशा प्रकारचे पार्सल किंवा जहाजाद्वारे येणाºया बिया देशातील प्रवेशाआधीच रोखाव्यात.
च्अमेरिकेच्या कृषी खात्याने या प्रकाराला कृषी तस्करी म्हटले आहे.