Government Job: लोकसभा सचिवालयात नोकरीची सुवर्णसंधी, सल्लागारासह विविध पदांवर भरती, दरमहा ६५ हजारांपर्यंत पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 07:48 PM2021-09-23T19:48:26+5:302021-09-23T19:48:59+5:30
Lok Sabha secretariat recruitment 2021: इच्छुक आणि योग्य उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांमध्ये (११ ऑक्टोबर २०२१) च्या आत निर्धारित प्रारूपामध्ये अर्ज करू शकता.
नवी दिल्ली - लोकसभा सचिवालयाने सल्लागार आणि अन्य विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. जर तुम्ही पदवीधर असाल तर ही सरकारी नोकरी तुमची वाट पाहत आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांमध्ये (११ ऑक्टोबर २०२१) च्या आत निर्धारित प्रारूपामध्ये अर्ज करू शकता.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी खालील माहिती विचारात घ्या. येथे आम्ही तुम्हाला व्हेकंसी डिटेल्स, कोण अर्ज करू शकतो, अर्ज कसा करावा, फी आणि पगार किती मिळेल, अशा प्रश्नांचे आम्ही देत आहोत. ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे. अर्ज करण्यासाठी लोकसभा सचिवालयाचे अधिकृत संकेतस्थळ loksabhadocs.nic.in वर जावे लागेल. या भरती प्रक्रियेमधून पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील. मात्र पदाप्रमाणे पात्रता वेगवेगळी आहे.
या पदांची होणार भरती
सोशल मीडिया मार्केटिंग (सिनियर कन्सल्टंट) -१ पद
सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर कन्सल्टंट) - १ पद
सिनियर कंटेंट रायटर/मीडिया अॅनॅलिस्ट (हिंदी) - १ पद
ज्युनियर कंटेंट रायटर (हिंदी) - १ पद
ज्युनियर कंटेंट रायटर (इंग्रजी) - १ पद
सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर असोसिएट्स) - ५ पदे
मॅनेजर (इव्हेंट्रस) - १ पद
अशी आहे शैक्षणिक पात्रता
सोशल मीडिय मार्केटिंग (सिनियर किंवा ज्युनियर कन्सल्टंट) - इंजिनियरिंग, बिझनेस मॅनेजमेंट, मार्केटिंग, जर्नेलिझम, पब्लिक रिलेशन किंवा कुठल्या अन्य संबंधित फिल्डमधील बॅचलरची डिग्री असली पाहिजे.
सिनियर कंटेंट रायटर/मीडिया अॅनॅलिस्ट (हिंदी) - पत्रकारिता किंवा पॉलिटिकल सायन्स किंवा कायदे किंवा हिंदी मधून पदवी मिळवलेली असावी.
ज्युनियर कंटेंट रायटर (हिंदी किंवा इंग्रजी) - पदवी
सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर असोसिएट्स) - कुठल्याही विषयामध्ये बॅचलर डिग्री
मॅनेजर (इव्हेंट्स) - पदवी, हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर डिप्लोमा किंवा डिग्री
एवढं मिळेल वेतन
सोशल मीडिया मार्केटिंग (सिनियर कन्सल्टंट) - ६५ हजार
मॅनेजर (इव्हेंट्स) - ५० हजार
सीनियर कंटेंट रायटर?/ मीडिया अॅनॅलिस्ट (हिंदी) - ४५ हजार रुपये
सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर कन्सल्टंट) - ३५ हजार रुपये
ज्युनियर कंटेंट रायटर (हिंदी) - ३५ हजार रुपये
ज्युनियर कंटेंट रायटर (इंग्रजी) - ३५ हजार रुपये
सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर असोसिएट्स) ३० हजार रुपये