Government Jobs: केंद्रात नोकरीची मोठी संधी; दोन दिवसांनी मुदत वाढविली; काही तास शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 02:41 PM2020-12-17T14:41:51+5:302020-12-17T14:42:24+5:30
SSC Vacancy 2020: कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) ने कंबाईन्ड सेकंडरी लेव्हल एक्झाम 2020 (CHSL) चे नोटिफिकेशन महिनाभरापूर्वी जारी केले आहे. महत्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी शेवटची संधी आहे.
12 वी पास झालेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) ने कंबाईन्ड सेकंडरी लेव्हल एक्झाम 2020 (CHSL) चे नोटिफिकेशन महिनाभरापूर्वी जारी केले आहे. महत्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी शेवटची संधी आहे. जर काही कारणास्तव अर्ज केला नसेल तर लगेचच धावपळ करावी व सरकारी नोकरीची संधी साधावी.
या पदांवर भरती
SSC द्वारा परिक्षेद्वारे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे.
- लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC)
- ज्युनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट
- पोस्टल असिस्टंट
- डाटा एंट्री ऑपरेटर्स
कोण अर्ज करू शकतात?
देशातील कोणत्याही बोर्डातून बारावी (10+2) उत्तीर्ण झालेले युवक या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची लिंक पुढे देण्यात आली आहे.
शुल्क
महिला उमेदवार, दिव्यांग, एससी, एसटी आणि माजी कर्मचाऱ्यांसाठी अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. तर अन्य उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
महत्वाच्या तारखा...
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 6 नोव्हेंबर 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
ऑनलाईन फी पेमेंटची अंतिम तारीख - 21 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
ऑफलाईन चलन अंतिम तारीख - 24 डिसेंबर 2020 (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
चलनसाठी फी पे करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर
परिक्षा
कॉम्प्युटरवरील परिक्षा 1 - 12 एप्रिल 2021 ते 27 एप्रिल 2021
परिक्षा दुसरी - नंतर घोषित केली जाईल.
वयाची अट
उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे. आरक्षित वर्गासाठी 15 वर्षांची सूट दिली जाईल. ती 27+15 अशी असेल.
डायरेक्ट लिंक
SSC CHSL Exam Notification 2020 साठी इथे क्लिक करा...
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...