दहावी पास तरुणांना 'नोकरी'ची सुवर्णसंधी; इंडियन कोस्ट गार्डमध्ये निघाली भरती
By Ravalnath.patil | Published: November 23, 2020 05:59 PM2020-11-23T17:59:39+5:302020-11-23T18:01:27+5:30
government jobs : निवड झालेल्या उमेदवारांना 47 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो.
देशातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्हाला इंडियन कोस्ट गार्डमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी 18 ते 22 वर्षांपर्यंतचे तरुण अर्ज करू शकतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, या नोकरीसाठी उमेदवाराची निवड झाल्यानंतर चांगला पगार मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 47 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो. कुक, स्टीवर्ड यांसारख्या विविध पदांसाठी भरती असणार आहे.
30 नोव्हेंबरपासून अर्जाची प्रक्रिया सुरू होईल
या जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबरपर्यंत असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवार इंडियन कोस्ट गार्डमध्येच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करु शकतात. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे दहावीमधील गुण 50 टक्के असले पाहिजेत. joinindiancoastguard.gov.in ही इंडियन कोस्ट गार्डची अधिकृत वेबसाइट आहे.
एकूण रिक्त पदांची संख्या 50
दहावी उत्तीर्ण उमेदवारांच्या या जागांमधील एकूण रिक्त पदांची संख्या 50 आहे. ज्यासाठी उमेदवार पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. एकूण 50 रिक्त जागांपैकी २० रिक्त जागांमध्ये 5 ईडब्ल्यूएस, 14 ओबीसी, 8 एससी आणि तीन रिक्त जागा एसटीसाठी आहेत. याचबरोबर, या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना वेतन ग्रेड 3 ते 47600 रुपये दरमहा मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत सूचना एकदा वाचली पाहिजे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
कोरोना संकट काळात नोकरीच्या संधी
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. भारतासह जगभरात मंदीचे वातावरण आहे. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका आणि रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.