पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स रद्द करण्याचा केरळ सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 04:56 PM2018-05-30T16:56:30+5:302018-05-30T16:56:30+5:30
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला केरळ सरकारने दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात आलेला टॅक्स न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला केरळ सरकारने दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात आलेला टॅक्स न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केरळमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचे दर 1 रुपयांचे कमी होणार आहेत.
केरळच्या मलयाला मनोरमाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स हटविण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर उद्यापासून लागू करण्यात येणार आहेत.
#Kerala government has decided to reduce the prices of petrol and diesel by 1 Rupee in the state, will come into effect on 1 June: CM Pinarayi Vijayan (File Pic) pic.twitter.com/Yf2wzGm34G
— ANI (@ANI) May 30, 2018
केरळमध्ये सध्या पेट्रोलवर 32.02 टक्के टॅक्स आकारण्यात येतो, तर डिझेलवर 25.58 टक्के टॅक्स लावला जातो. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलवर 1 टक्का सेस सुद्धा आकारण्यात येतो. गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेल्या टॅक्सपासून राज्य सरकारला 7795 कोटी रुपयांचे महसूल मिळाले आहे.