भजी तळण्यासाठी वापरलेल्या तेलावर धावणार कार; प्रदूषण टाळण्यास लागणार हातभार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:23 PM2019-08-12T12:23:41+5:302019-08-12T12:24:22+5:30

नव्या योजनेसाठी मोदी सरकारची तयारी जवळपास पूर्ण

Government launches programme for converting used cooking oil into biodiesel | भजी तळण्यासाठी वापरलेल्या तेलावर धावणार कार; प्रदूषण टाळण्यास लागणार हातभार

भजी तळण्यासाठी वापरलेल्या तेलावर धावणार कार; प्रदूषण टाळण्यास लागणार हातभार

Next

मुंबई: पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी मोदी सरकारनं आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर आता सरकारनं बायोडिझल (जैवइंधनाच्या) दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वापरलेल्या तेलापासून बायोडिझेलची निर्मिती करण्यात येईल. यासाठी पहिल्या टप्प्यात देशभरातील 100 शहरांमध्ये कारखान्यांची उभारणी केली जाईल. त्यामुळे भविष्यात बायोडिझेलवर धावणारी वाहनं पाहायला मिळतील. 

बायोडिझलच्या वापराचे अनेक फायदे होणार आहेत. यामुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. याशिवाय वाहनांचं आयुमानदेखील वाढेल. पर्यावरण प्रदूषण कमी करणाऱ्या बीएस-6 वाहनांच्या श्रेणीत बायोडिझलवर चालणाऱ्या गाड्यांचा समावेश केला जाईल. बायोडिझेलच्या निर्मितीसाठी हरतऱ्हेची मदत करण्याचं आश्वासन मोदी सरकारकडून इंधन कंपन्यांना देण्यात आलं आहे. यासाठी 10 ऑगस्टला जागतिक जैवइंधन दिनानिमित्त पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्यासह विशेष प्रकल्पाची घोषणा केली. 

बायोडिझेलच्या निर्मितीसाठी आता सरकारी इंधन कंपन्या खासगी  कंपन्यांशी करार करतील. या कंपन्यांकडून बायोडिझेलची निर्मिती केली जाईल. सुरुवातीला इंधन कंपन्या 51 रुपये प्रति लीटर दरानं बायोडिझेलची विक्री केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी बायोडिझेलची किंमत 52.7 आणि 54.5 रुपयांवर जाईल. 

नव्या योजनेसाठी धर्मेंद्र प्रधान यांनी रिपर्पज यूज्ड कुकिंग ऑईल (आयूसीओ) स्टीकर आणि यूज्ड कुकिंग ऑईलसाठी (यूसीओ) मोबाईल अ‍ॅपदेखील लॉन्च केलं आहे. एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरलं जाणार नाही, यावर अ‍ॅपच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाईल. या योजनेच्या अंतर्गत हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये स्टीकर लावले जातील. आम्ही बायोडिझेलचा पुरवठा करतो, यासाठी हे स्टीकर लावले जातील. 
 

Web Title: Government launches programme for converting used cooking oil into biodiesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.