Corona Vaccine : कार्यालयांनी केवळ कर्मचाऱ्यांनाच लस द्यावी, त्यांच्या कुटुंबीयांना नको; सरकारचे स्पष्ट निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 03:42 PM2021-05-22T15:42:49+5:302021-05-22T15:44:36+5:30
Coronavirus Vaccine : Government limits workplace vaccination drives to staff only vaccine wont give it to family members कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण करता येणार नाही, सरकारचे निर्देश. छोटी गावं आणि शहरांमध्ये याचे परिणाम जाणवण्याची व्यक्त करण्यात आली भीती.
सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांचंच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांचं आणि त्यांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता केंद्र सरकारनं पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. कामाच्या ठिकाणी केवळ कर्मचाऱ्यांचंच लसीकरण करता येणार असून त्यांच्या कुटुंबीयांना आता लस मिळणार नाही. कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण करता येणार नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. Corona Vaccine : Government limits workplace vaccination drives to staff only vaccine wont give it to family members
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं राज्य सरकारांना दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनंतर अनेक कंपन्या आणि उद्योग संस्था संभाव्य आढावा घेण्यासाठी सरकारकडे हा मुद्दा उपस्थित करत आहेत. हे पत्र ४५ वर्षे वयाच्या पुढील कर्मचार्यांपुरतीच मर्यादित आहे असा संदर्भ असला तरी उद्योग मंडळं तसंच कॉर्पोरेट संस्थांनी या नियमांबद्दल आपल्याला कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. याशिवाय या पत्रात काही मार्गदर्शक सूचनांमध्ये बदलांचाही उल्लेख आहे, जे यापूर्वी स्पष्टपणे संकेतस्थळावर उपलब्ध नव्हते. यामुळेच काही कंपन्यांची सरकारकडे यासंदर्भात स्पष्टता आणण्याची मागणी केली आहे.
छोट्या गावांमध्ये अधिक परिणाम जाणवेल
“जर हे लागू करण्यात आलं असतं तर लोकांना अन्य सेंटर्समध्ये अपॉईंटमेंट मिळाली असतं. परंतु आता १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मर्यांदेमध्ये हे अशक्य आहे,” असं एका कंपनीच्या अधिकाऱ्यानं नमूद केलं. “बुधवारी झालेल्या चर्चेचा रुग्णालयांच्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या संबंधांवर परिणाम होणार नाही. परंतु लसीकरणाचे जे उपक्रम कार्यालयांमध्ये राबवण्यात येत आहेत त्यावर याचा परिणाम होईल,” असं सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. छोटी गावं आणि शहरांमध्ये याचा परिणाम अधिक जाणवेल अशी शक्यता आहे. ज्या ठिकाणी रुग्णालयांची साखळी नाही अशा ठिकाणी काही कंपन्या लसीकरणाचे उपक्रम राबवत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कर्मचारी मोहिमेतून बाहेर पडण्याची भीती
सरकारनं लसीकरणाच्या बाबतीत उचलेलं हे पाऊल खऱ्या अर्थानं भ्रम निर्माण करणारं आहे. आरोग्य मंत्रालयानं आम्हाला मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्याचं कोणतंही कारण सांगितलं नाही, असं एका प्रमुख उद्योग संस्थेच्या पदाधिकाऱ्यानं नमूद केलं. आरोग्य मंत्रालयानं कोणतंही कारण दिलं नसल्यानं यामागे लसींची कमतरता असल्याचं काही उद्योगांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तसंच आपल्या कुटुंबीयांचं लसीकरण करण्यात येत नसल्यानं या लसीकरण मोहिमेतून कर्मचारीही बाहेर पडू शकतील अशी भीती कंपन्यांनी व्यक्त केली आहे.