‘एनएसजी’च्या मुद्द्यावर सरकारकडून दिशाभूल

By Admin | Published: June 27, 2016 04:17 AM2016-06-27T04:17:25+5:302016-06-27T04:17:25+5:30

(एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने एवढी धडपड करण्याची तसेच अर्जदार म्हणून भारताने या गटाकडे जाण्याची गरज नव्हती.

The government is misguided on the issue of NSG | ‘एनएसजी’च्या मुद्द्यावर सरकारकडून दिशाभूल

‘एनएसजी’च्या मुद्द्यावर सरकारकडून दिशाभूल

googlenewsNext


नवी दिल्ली : अणु पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने एवढी धडपड करण्याची तसेच अर्जदार म्हणून भारताने या गटाकडे जाण्याची गरज नव्हती. या गटाचा सदस्य बनून भारत काही मिळविण्याऐवजी गमावणारच होता. सरकारमध्ये बसलेले लोक याबाबत दररोज दिशाभूल करीत आहेत, असे सांगत माजी विदेशमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा अहेर दिला आहे.
भारताने एनएसजीचे सदस्यत्व स्वीकारू नये हे मी ठामपणे सांगत आहे. आपल्याला जे हवे ते आधीच मिळाले आहे, असे ८३ वर्षीय सिन्हा यांनी स्पष्ट केले. भारताने सदस्यत्व मिळविण्यासाठी खूपच उत्सुकता आणि न मिळाल्यामुळे निराशा दर्शविली. त्याची काहीही आवश्यकता नाही. भारत एनएसजीच्या बाहेरच योग्य आहे. आपण सदस्य बनल्यास नुकसानच जास्त आहे. आपल्याला कोणताही लाभ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>एनएसजी सदस्यत्वाच्या भारताच्या आशा पल्लवित
अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या भारतासारख्या देशांना प्रवेश देण्याच्या संदर्भात विचार करण्यासाठी अणु पुरवठादार समूहाचे सदस्य असलेल्या राष्ट्रांची या वर्षाअखेर पुन्हा एक बैठक बोलावली जाणार आहे. त्यामुळे ४८ सदस्यीय एनएसजीचे सदस्यत्व मिळण्याबाबतच्या भारताच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
तूर्त एनएसजीचे सदस्यत्व मिळाले नसले तरी आम्ही प्रयत्न सुरुच ठेवू. संबंध सुधारायचे असतील तर उभय देशांना परस्परांचे हित, चिंता व अग्रक्रम जपावे लागतील, हे चीनला पटवून देत राहू.
- विकास स्वरूप
सरकारला मुद्दा समजला काय?
सरकारमध्ये बसलेल्या लोकांना हा मुद्दा समजला की नाही ते माहीत नाही, मात्र सरकारमध्ये असे लोक बसले आहेत की ते सरकारची दररोज दिशाभूल करीत आहेत, हे मला माहीत आहे, असेही सिन्हा यांनी नमूद केले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकीर्दीत सिन्हा हे विदेशमंत्री राहिले होते. त्यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधासह मोदी सरकारच्या विदेश धोरणासंबंधी विविध मुद्यांवर रोखठोकपणे मते मांडली.

Web Title: The government is misguided on the issue of NSG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.