सरकारी नेटवर्क ‘रॅन्समवेअर’पासून सुरक्षित

By admin | Published: May 17, 2017 01:43 AM2017-05-17T01:43:09+5:302017-05-17T01:43:09+5:30

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘वन्नाक्राय’या रॅन्समवेअर व्हायरसपासून सरकारी संगणकप्रणालीचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली असल्याचे

Government network safe from 'Ranmware' | सरकारी नेटवर्क ‘रॅन्समवेअर’पासून सुरक्षित

सरकारी नेटवर्क ‘रॅन्समवेअर’पासून सुरक्षित

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘वन्नाक्राय’या रॅन्समवेअर व्हायरसपासून सरकारी संगणकप्रणालीचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिव अरुणा सुंदरराजन यांनी दिले.
रॅन्समवेअर व्हायरसबाबत केंद्र सरकारला मार्चपासूनच हायअलर्ट दिलेला होता. आवश्यक ती सुविधा यापूर्वीच संगणकप्रणाली इंन्स्टॉल केलेली आहे. येथे ब्रॉडबँड इंडिया फोरमच्या उद्घाटन सत्रात बोलताना अरुणा सुंदरराजन म्हणाल्या
की, येथील प्रणालीवर या
व्हायरसचा परिणाम झाल्याचे कुठलेही प्रकरण अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान, माहितीतंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारीच स्पष्ट केले होते की, रॅन्समवेअर व्हायरसचा देशातील प्रभाव शून्य टक्के आहे. आम्ही आमची सायबर सुरक्षा मजबूत करत आहोत. मायक्रोसॉफ्टशी चर्चा केल्यानंतर आम्ही लोकांना मार्चमध्येच‘पॅच सिस्टिम’इन्स्टॉल करण्यास सांगितले होते, असेही प्रसाद यांनी सांगितले.

हॅकर्सची उत्तर कोरियाशी लिंक
- १५० देशात धुमाकूळ घालणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसचे सायबर गुन्हेगार शोधण्याची मोहिम सुरु आहे. या हॅकर्सची लिंक उत्तर कोरियाशी असू शकते, असा दावा गुगलसोबत काम करणारे भारतीय वंशाचे सेक्युरिटी रिसर्चर नील मेहता यांनी केला आहे.
- उत्तर कोरियासाठी काम करणारा ‘लाजारस ग्रुप’या हल्ल्यामागे असू शकतो. ‘वन्नाक्राय’मध्ये वापरण्यात आलेल्या कोडिंग आणि टूल्सचा उपयोग हा ग्रुप करतो.
- २०१४ मध्ये सोनी पिक्चर्सच्या हॅकिंगचे आणि २०१६ मध्ये बांग्लादेशातील एका बँकेत हॅकिंगची घटना घडली होती. त्याला लाजारस ग्रुपच जबाबदार होता. एक अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे की, लाजारस ग्रुप हा कुणाच्याही निर्देशाशिवाय स्वतंत्रपणे काम करत असावा.

Web Title: Government network safe from 'Ranmware'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.