मुलांची दोन-दोन हॉस्टेल सोडून मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होता सरकारी अधिकारी, अभाविपने मध्यरात्री पकडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 21:24 IST2025-01-22T21:24:35+5:302025-01-22T21:24:51+5:30
अभाविपच्या नेत्यांनी मध्यरात्रीच गर्ल्स हॉस्टेकडे मोर्चा वळवत या अधिकाऱ्याला जाब विचारला तेव्हा त्यांची भंबेरी उडाली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला फोन करून तिथून जाण्यास सांगितले.

मुलांची दोन-दोन हॉस्टेल सोडून मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होता सरकारी अधिकारी, अभाविपने मध्यरात्री पकडले...
बाजुला असलेली मुलांची हॉस्टेल सोडून मुलींच्या हॉस्टेलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून राहत असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याला पकडून देण्यात आले आहे. अभाविपच्या नेत्यांनी मध्यरात्रीच गर्ल्स हॉस्टेकडे मोर्चा वळवत या अधिकाऱ्याला जाब विचारला तेव्हा त्यांची भंबेरी उडाली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला फोन करून तिथून जाण्यास सांगितले.
राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यातील हा प्रकार आहे. हा अधिकारी समाज कल्याण विभागाचा उप संचालक आहे. त्याला मुलांची दोन हॉस्टेल सोडून मुलींच्याच हॉस्टेलमध्ये का राहिला असे विचारले असता यावर उत्तर देता आले नाही. तसेच वेळोवेळी तो त्याची उत्तरे बदलत होता. अशफाक खान असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
अशफाक हा गेल्या तीन दिवसांपासून मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याला मध्यरात्री पकडण्यात आले. हॉस्टेलच्या सिक्युरिटीने जिल्हाधिकारी राहत असल्याचे अभाविपला सांगितले. अशफाकने त्यांना जिल्हाधिकारी असल्याचे सांगितले असावे, असा आरोप अभाविपने केला आहे. त्याला पकडल्यानंतर थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच फोन लावण्यात आला. सावित्री बाई फुले गर्ल्स हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला आहे.
अभाविपने पोलिसांनाही याची माहिती दिली. या साऱ्या प्रकारामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अशफाकला होस्टेल सोडण्यास सांगितले. तसेच त्याच्याकडून लेखी कारण मागविणार असल्याचे सांगितले. याचबरोबर पोलिसांनाही तैनात केले जाणार असल्याचे म्हटले आहे. स्थानिक पोलिसांना घेऊनच अभाविपचे कार्यकर्ते हॉस्टेलमध्ये गेले होते.
कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता अशफाकने तो निरीक्षण करण्यासाठी आला होता, असे पहिले कारण सांगितले. उशीर झाल्याने इथेच थांबलो, असे म्हणाला. नंतर आपल्याला बदली झाल्याने राहण्यासाठी निवासस्थान दिलेले नाही, त्यामुळे थांबल्याचे सांगितले. समाज कल्याण विभागाची दोन मुलांची हॉस्टेल बाजुलाच आहेत, तिथे का थांबला नाही असा सवाल करताच तो निरुत्तर झाला.