शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:08 AM2017-12-18T00:08:12+5:302017-12-18T00:08:18+5:30
शेतक-यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे दिली. नाबार्डच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
नवी दिल्ली : शेतक-यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे दिली. नाबार्डच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
जेटली म्हणाले, भारताची मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीत काम करणाºया लोकांची क्रयशक्ती वाढविण्यावर भर द्यावा लागेल. कारण अर्थव्यवस्थेची वृद्धी या समूहाच्या आर्थिक क्षमतेवर व ताकदीवर अवलंबून आहे. काही विकसित देश प्रत्यक्ष अथवा विविध प्रकारच्या सबसिडीच्या माध्यमातून असा प्रयत्न करतात की, पैसा शेतकºयांच्या खिशात पोहोचावा. ज्या देशांकडे हे आर्थिक आव्हान पेलण्याची शक्ती नाही, त्यांना शेतकºयांच्या उपजीविकेबाबत अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
भारत सरकार २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा चांगल्या करण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील रस्ते, वीज, सिंचन सुविधा उपलब्ध करणे, लोकांना घरे उपलब्ध करून देणे यासारखे प्रयत्न सुुरू आहेत. कर्जाची उपलब्धता, व्याज अनुदान आणि पीक विमा हे या प्रयत्नांचाच एक भाग आहेत.