शासकीय दर कमी

By Admin | Published: February 8, 2016 12:24 AM2016-02-08T00:24:04+5:302016-02-08T00:24:04+5:30

शासकीय दूध संकलन केंद्रावर दुधातील फॅटस्चे प्रमाण तपासले जाते. दुधात फॅटस्चे प्रमाण कमी असल्यास दूध विकत घेतले जात नाही. त्यामुळे बहुतांश दूध उत्पादक शहरातील हॉटेल, चहाटपरीवाले आणि इतर ग्राहकांना दूध विकणे अधिक पसंत करतात. खुल्या बाजाराच्या तुलनेत शासकीय दूध खरेदीचे दर कमी आहेत. खासगी व्यावसायिक नासलेल्या दुधाचा उपयोग दही, ताक, पनीर यासह इतर पदार्थ तयार करण्यासाठी करतात.

Government rate reduction | शासकीय दर कमी

शासकीय दर कमी

googlenewsNext
सकीय दूध संकलन केंद्रावर दुधातील फॅटस्चे प्रमाण तपासले जाते. दुधात फॅटस्चे प्रमाण कमी असल्यास दूध विकत घेतले जात नाही. त्यामुळे बहुतांश दूध उत्पादक शहरातील हॉटेल, चहाटपरीवाले आणि इतर ग्राहकांना दूध विकणे अधिक पसंत करतात. खुल्या बाजाराच्या तुलनेत शासकीय दूध खरेदीचे दर कमी आहेत. खासगी व्यावसायिक नासलेल्या दुधाचा उपयोग दही, ताक, पनीर यासह इतर पदार्थ तयार करण्यासाठी करतात.
---
दूध उत्पादनात सावनेर तालुका अव्वल
जिल्ह्यात दुधाचे सर्वाधिक उत्पादन सावनेर तालुक्यात होते. काटोल तालुक्यात २०१२-१३ मध्ये ७ लाख ३५ हजार ७२७ लिटर, २०१३-१४ मध्ये ६ लाख ६३ हजार ५५३ लिटर आणि २०१४-१५ मध्ये ५ लाख ९५ हजार १८५ लिटर दुधाचे उत्पादन होते. कळमेश्वर तालुक्यात अनुक्रमे ३ लाख ७९ हजार ७९२ लिटर, ४ लाख ४१ हजार ३८० लिटर व ५ लाख १८ हजार ३६३ लिटर, नरखेड तालुक्यात ३ लाख २९ हजार ९१८ लिटर, ३ लाख २२ हजार ४९१ लिटर व २ लाख ६९ हजार ७९२ लिटर, सावनेर तालुक्यात ६ लाख ९८ हजार ७८२ लिटर, ६ लाख ३० हजार ९४२ लिटर व ७ लाख ३६ हजार ९८७ लिटर, हिंगणा तालुक्यात २ लाख २३ हजार ११८ लिटर, २ लाख २१ हजार ७८९ लिटर व २ लाख ३ हजार १६१ लिटर, रामटेक तालुक्यात १ लाख ६० हजार ३७ लिटर, ३ लाख १४ हजार ८२८ लिटर व ३ लाख ८६ हजार २२ लिटर, मौदा तालुक्यात १ लाख ६५ हजार ४२७ लिटर, १ लाख ५४ हजार ४४४ लिटर व ५७ हजार २०१ लिटर, पारशिवनी तालुक्यात १ लाख २८ हजार ८१४ लिटर, १ लाख ७ हजार ४०२ लिटर व ४६ हजार ९८२ लिटर, कामठी तालुक्यात १ लाख ६६ हजार ६७२ लिटर, १ लाख ३३ हजार ३२७ लिटर व ८ हजार १२३ लिटर दुधाचे उत्पादन झाल्याची माहिती नागपूर जिल्हा नूतन दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
---

Web Title: Government rate reduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.