सरकार चर्चेसाठी तयार, पण विरोधकांनी गोंधळ थांबवावा - व्यंकय्या नायडू

By admin | Published: November 18, 2016 02:16 PM2016-11-18T14:16:09+5:302016-11-18T14:16:09+5:30

नोटाबंदीच्या मुद्यावर सरकार चर्चेस तयार असतानाही विरोधक का गोंधळ घालत आहेत असा सवाल व्यंकय्या नायडूंनी विचारला आहे.

Government ready for talks but stop confusion by opponents - Venkiah Naidu | सरकार चर्चेसाठी तयार, पण विरोधकांनी गोंधळ थांबवावा - व्यंकय्या नायडू

सरकार चर्चेसाठी तयार, पण विरोधकांनी गोंधळ थांबवावा - व्यंकय्या नायडू

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांच्या संसदेतील गदारोळामुळे सरकार नाराज असून या गोंधळी भूमिकेबद्दल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्याने राज्यसभा दुपारपर्यंत तर लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली.
' आम्ही (सरकार) चर्चेसाठी तयार आहोत. तरीही विरोधक गोंधळ का घालत आहेत हे समजत नाहीये. ते (विरोधक) मुद्यापासून भरकटत असून चर्चेपासून पळ काढत आहेत', असा आरोपही नायडू यांनी केला. ' गरज पडल्यावर पंतप्रधान स्वतः सभागृहात उपस्थित राहतात आणि चर्चेत सहभागी होतात. पण या मुद्यावरून गोंधळ माजवत कामकाज बंद पाडणे हे अत्यंत चुकीचे आहे' अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. तसेच उरी हल्ल्याबाबत गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत केलेल्या विधानावर काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही नायडू यांनी केली. 

Web Title: Government ready for talks but stop confusion by opponents - Venkiah Naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.