सरकारनं मीडियाच्या कामात नाक खुपसू नये- पंतप्रधान मोदी
By Admin | Published: November 16, 2016 04:38 PM2016-11-16T16:38:42+5:302016-11-16T16:38:42+5:30
सरकारनं मीडियाच्या कामात हस्तक्षेप करू नये. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - सरकारनं मीडियाच्या कामात हस्तक्षेप करू नये. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आणीबाणीच्या काळात मीडियावर कशा प्रकारे बंदी घालण्यात आली हे आमच्या आजही लक्षात आहे. त्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि त्यांनी देशातली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणली, असं म्हणत मोदींनी इंदिरा गांधी सरकारवर टीका केली आहे. जगासमोर सत्य उघड करणा-या पत्रकाराची हत्या हा गंभीर विषय आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दिल्लीतल्या विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
मीडिया स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी चांगली भूमिका बजावते आहे. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, असंही मोदींनी सांगितलं आहे. पत्रकारिता करताना पत्रकारांना जीव गमवावा लागत आहे, खरोखरचं ही फार गंभीर बाब आहे. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करण्याची गरज असल्याचंही मतही त्यांनी मांडलं आहे.
Any death is worrisome, but journalists losing their lives just because they try showing the truth,it becomes even more serious then:PM Modi pic.twitter.com/PihnKLuutF
— ANI (@ANI_news) November 16, 2016