सरकार तरुणांचा आवाज दडपत आहे - जिग्नेश मेवाणी; बंदी घालूनही संसद मार्गावर झाली ‘हुंकार’ रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:35 PM2018-01-09T23:35:30+5:302018-01-09T23:35:41+5:30

आम्ही राज्यघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुलेंच्या विचारांना आम्ही मानतो. तुम्ही कितीही हल्ले केले तरीही आमच्या तोंडून राज्यघटनेविषयी आदरच व्यक्त होईल. आम्ही कधीही कोणत्याच धर्माविरोधात नव्हतो नसू.

Government is suppressing the voice of young people - Jignesh Mavani; Hoonar Rally on the Parliament Street | सरकार तरुणांचा आवाज दडपत आहे - जिग्नेश मेवाणी; बंदी घालूनही संसद मार्गावर झाली ‘हुंकार’ रॅली

सरकार तरुणांचा आवाज दडपत आहे - जिग्नेश मेवाणी; बंदी घालूनही संसद मार्गावर झाली ‘हुंकार’ रॅली

Next

- सुरेश भटेवरा

नवी दिल्ली : आम्ही राज्यघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुलेंच्या विचारांना आम्ही मानतो. तुम्ही कितीही हल्ले केले तरीही आमच्या तोंडून राज्यघटनेविषयी आदरच व्यक्त होईल. आम्ही कधीही कोणत्याच धर्माविरोधात नव्हतो नसू. तरुणांच्या व्यथा, वेदना मांडण्याचा अधिकार लोकप्रतिनिधीला नसेल तर असे गुजरात मॉडेल तुम्हालाच लखलाभ होवो, असे उद्गार आ. जिग्नेश मेवाणींनी हुंकार रॅलीत काढले.
तुम्हाला मनुस्मृती मान्य आहे की भारताची राज्यघटना? भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अखिल गोगोईविरुध्द एफआयआर कोणत्या आधारे दाखल झाली? रोहित वेमुलाला आत्महत्या का करावी लागली? भीम आर्मीला लक्ष्य का केले जात आहे? कोट्यवधी तरुणांना रोजगार का नाही? मध्यप्रदेशात निरपराध शेतकºयांवर गोळीबार का केला? या साºया प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदींना द्यावीच लागतील, असे मेवाणी म्हणाले.

सुरक्षा तैनात
या रॅलीवर बंदी घातल्यानंतरही संसद मार्गावर मोठी गर्दी होईल या शक्यतेने मोठ्या संख्येत सुरक्षा दले तैनात करण्यात आली. बंदोबस्तामुळे अनेकांना सभास्थळी पोहोचताच आले नाही.

Web Title: Government is suppressing the voice of young people - Jignesh Mavani; Hoonar Rally on the Parliament Street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.