म्यानमारमध्ये सू की यांचे सरकार येणार

By admin | Published: November 10, 2015 10:53 PM2015-11-10T22:53:12+5:302015-11-10T22:53:12+5:30

भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्ये २५ वर्षांनंतर लोकशाहीसमर्थक आँग सॅन सू की यांचा ‘नॅशनल डेमोक्रॅटिक लीग’ हा पक्ष मोठ्या बहुमताकडे वाटचाल करीत आहे.

The government of Suu Kyi in Myanmar will come | म्यानमारमध्ये सू की यांचे सरकार येणार

म्यानमारमध्ये सू की यांचे सरकार येणार

Next

यांगून : भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्ये २५ वर्षांनंतर लोकशाहीसमर्थक आँग सॅन सू की यांचा ‘नॅशनल डेमोक्रॅटिक लीग’ हा पक्ष मोठ्या बहुमताकडे वाटचाल करीत आहे.
म्यानमारमधील सत्ताधारी युनियन सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हते ओ यांनी पराभव स्वीकारून ‘आम्ही हरलो आहोत’, अशी कबुली दिली आहे. त्यामुळे या गरीब देशात आँग सॅन सू की यांचे सरकार स्थापन होणे अटळ आहे.
गेल्या रविवारी येथे सार्वत्रिक निवडणूक झाली होती. सोमवारी मतमोजणी सुरू झाली. निकाल जाहीर होताच सू की यांचे समर्थक नॅशनल डेमोक्रॅटिक लीगच्या मुख्यालयाच्या बाहेर जमा झाले. लाल टी शर्ट घालणाऱ्या या सू की समर्थकांनी विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या.
या निवडणुकीत ८० टक्के मतदान झाले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांविरुद्ध निर्माण झालेला असंतोष मतदारांनी मतपेटीद्वारे व्यक्त करीत सू की यांना विजयी केले. वरिष्ठ सभागृहात सू की यांनी १२ जागा जिंकल्या आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: The government of Suu Kyi in Myanmar will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.