तेलंगणा सरकार ८६ लाख साड्या वाटप करणार

By admin | Published: May 9, 2017 12:37 AM2017-05-09T00:37:36+5:302017-05-09T00:38:57+5:30

विविध कल्याणकारी योजनांनंतर तेलंगणातील के. चंद्रशेखर राव सरकार आता आणखी एक योजना सुरू करणार आहे.

The government of Telangana will distribute 86 lakh saris | तेलंगणा सरकार ८६ लाख साड्या वाटप करणार

तेलंगणा सरकार ८६ लाख साड्या वाटप करणार

Next

हैदराबाद : विविध कल्याणकारी योजनांनंतर तेलंगणातील के. चंद्रशेखर राव सरकार आता आणखी एक योजना सुरू करणार आहे. या योजनेतून तेलंगणातील भुकेकंगाल विणकारांना रोजगार तर मिळणार आहेच, तद्वतच मोठ्या संख्येने महिलांना सरकार आणि पक्षाकडे (तेलंगणा राष्ट्र समिती) आकर्षित करण्यासही मदत होईल. या योजनेतहत राज्य सरकारचा दारिद्र्यरेषेखालील महिलांना ८६ लाख साड्या वाटप करण्याचा बेत आहे.
या योजनेचा मुहूर्तही राज्य सरकारने निश्चित केला असून, बतुकम्मा उत्सवादरम्यान साड्या वाटप करणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर साड्या वाटप करणे सुलभ व्हावे म्हणून तेलंगणातील, विशेषत: सिर्सिला येथील हातमाग आणि यंत्रमाग विणकरांकडे साड्यांची मागणी नोंदविली जाणार
आहे.
साड्या खरेदीसाठी १६० कोटींचा खर्च येईल. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा राष्ट्र समिती सरकारची ही योजना म्हणजे महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी एक निवडणूक खेळी होय, अशी टीका होणे स्वाभाविक असले तरी यातून जगण्यासाठी धडपड करणाऱ्या विणकरांच्या हाताला काम मिळणार असून, या कामाचे दामही मिळणार आहे.
या साडीचा रंग आणि नक्षीकामही ठरविण्यात आले असून, यावर तेलंगणा आणि राज्यांची संस्कृती प्रतीत करणारे नक्षीकाम असेल. राज्य सरकार लवकरच तेलंगण राज्य हातमाग विणकर सहकारी संस्थेकडे मागणी नोंदविणार आहे.
तेलंगण हातमाग विणकर सहकारी संस्थेचे सह-संचालक पी. यादगिरी यांनी समाजकल्याण, आरोग्य, वैद्यकीय आणि पर्यटन विभागाने नोंदविलेल्या मागणीसंदर्भात बोलण्याचे टाळले आहे. (वृत्तसंस्था)
केसीआर कीट-
याशिवाय केसीआर कीटचा (गृहोपयोगी भेट वस्तूसंच) भाग म्हणून राज्य सरकारने ५ लाख साड्या विणण्याचे कामही दिले असून, यासाठी १२.५ कोटी खर्च येणार आहे. या कीटमध्ये माता आणि बालकांसाठी साबण, तान्ह्या बाळांसाठी अंगमर्दन तेल, बाळांसाठी पथरुणी, मच्छरदाणी, कपडे, साडी, आकर्षक पिशवी, पंचा (टॉवेल), हातरुमाल, पावडर, बाळलंगोट, खेळणी आदींचा यात समावेश असेल. ही योजना प्रत्यक्षात उतरल्यास संसारोपयोगी वस्तूंसह यंदाचा बतकम्मा उत्सव विणकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल.

Web Title: The government of Telangana will distribute 86 lakh saris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.