15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 07:02 PM2020-07-29T19:02:24+5:302020-07-29T19:12:49+5:30
या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या स्टाफला आता केवळ परेडच्या सरावात आणि कार्यक्रमाशी संबंधित तयारीतच भाग घेता येईल. तसेच काम पूर्ण होताच सर्वजन पून्हा आपल्या घरी जातील.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि स्वातंत्र्य दिन समारंभाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या वर्षी 15 ऑगस्टच्या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या, भारतीय लष्कर, भारती हवाईदल, भारतीय नौदल आणि दिल्ली पोलीसच्या सर्व अधिकाऱ्यांना, तसेच त्यांचे ड्रायव्हर, ऑपरेटर, कुक, परेड ट्रेनर तथा इतर स्टाफला 15 ऑगस्टपर्यंत क्वारंटाइन करण्यात आले आहे.
या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या स्टाफला आता केवळ परेडच्या सरावात आणि कार्यक्रमाशी संबंधित तयारीतच भाग घेता येईल. तसेच काम पूर्ण होताच सर्वजन पून्हा आपल्या घरी जातील. दिल्ली पोलीसच्या संपूर्ण स्टाफलादेखील याच पद्धतीचा मौखिक आदेश देण्यात आला आहे
15 ऑगस्टला होणाऱ्या स्वातंत्र दिनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय अनेक VVIP आणि VIP सहभागी होत असतात. या कार्यक्रमाच्या वेळी स्वत: पंतप्रधान रेड कार्पेटवरून गार्ड ऑफ ऑनरच्या वेळी परेड कमांडर आणि जवानांमधून जात असतात. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेत सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
याशिवाय कार्यक्रमापर्यंत परेडच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक सरकारी गाड्या रोजच्यारोज सॅनिटाइझ करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. भारतीय लष्कराचा पुढाकार आणि नियोजनानंतरच कोरोनापासून बचावासाठी सरकारने ही रूपरेखा तयार केली आहे. तसेच कोरना महामारीच्या संकटामुळे यावेळी लाल किल्ल्यावर फार थोडे लोक उपस्थित असतील.
महत्त्वाच्या बातम्या -
आता डोळे वर करून बघणार नाही शत्रू, 'या' ठिकानाहून फक्त 20 मिनिटांत इस्लामबादवर हल्ले करून शकतं राफेल
सुस्साट वेग, खतरनाक रेंज अन् 70 लाखांचं क्षेपणास्त्र, जाणून घ्या राफेल का आहे 'ब्रह्मास्त्र'
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...
Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी
CoronaVirus : भारतात 'या' 5 ठिकाणी होणार कोरोना लसीची चाचणी, असे निवडले जातायत लोक
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर