काय सांगता? 'या' सरकारकडून मुलीला लग्नात 1 तोळं सोन्याची भेट; जाणून घ्या कसा होणार लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 12:19 PM2020-12-11T12:19:57+5:302020-12-11T12:35:16+5:30
Arundhati Gold Scheme : सरकारने मुलीच्या लग्नात तिला भेट देण्यासाठी एक नवी योजना सुरू केली आहे.
नवी दिल्ली - आपल्या लाडक्या लेकीचं लग्न थाटामाटात, धुमधडाक्यात व्हावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यामुळेच मुलीच्या जन्मापासूनच ते तिच्यासाठी थोडे थोडे पैसे जमा करायला सुरुवात करतात. मात्र आता मुलींच्या पालकांसाठी एक खूशखबर आहे. आसाम सरकारने मुलीच्या लग्नात तिला भेट देण्यासाठी एक नवी योजना सुरू केली आहे. आसाम सरकारने अरुंधती गोल्ड स्कीम (Arundhati Gold Scheme) नावाच्या एका योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेंतर्गत मुलींना विवाहात सरकारकडून 10 ग्रॅम सोनं म्हणजेच एक तोळं सोनं भेट म्हणून देण्यात येणार आहे.
गरीब पालकांना अरुंधती गोल्ड स्कीमचा मोठा फायदा होणार आहे, आर्थिकदृष्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबांना यामुळे थोडी मदत होणार आहे. इच्छा असूनही केवळ परिस्थितीमुळे मुलींना मदत न करू शकणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. सरकारकडून मुलींसाठी अनेक योजना राबवण्यात येतात. यातील शिक्षणाच्या सुविधांचा अधिकाधिक फायदा पालकांना घेता येईल. यामध्ये आता अरुंधती गोल्ड स्कीमची भर पडली आहे. यामुळे मुलींच्या विवाहाच्या वेळी सरकारकडून 10 ग्रॅम सोनंही मिळणार आहे.
जाणून घ्या कसा आणि कोणाला होणार लाभ
अरुंधती सुवर्ण योजनाचा लाभ अशा कुटुंबांना घेता येईल ज्यांना एक किंवा दोन मुली आहेत. मात्र तीन किंवा त्यांहून अधिक मुली असतील तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेचा लाभ तेव्हाच घेता येईल जेव्हा विवाहावेळी मुलीचं वय 18 वर्षांहून अधिक आणि मुलाचं वय 21 वर्षांहून अधिक असेल. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांचं वार्षिक उत्पन्न पाच लाखांहून कमी असायला हवं. त्याहून अधिक उत्पन्न असल्यास या योजनेचा फायदा मिळणार नाही.
मुलींच्या पालकांसाठी खूशखबर! सरकारकडून विवाहासाठी मिळणार 10 ग्रॅम सोनं
सरकारकडून मुलींच्या विकासासाठी, त्यांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी विविध योजना या सुरू केल्या आहेत. त्यातीलच ही एक उपयुक्त योजना आहे. अरुंधती गोल्ड स्कीमचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शासनाकडे माहितीसह एक अर्ज दाखल करावा लागणार आहे. आसाम सरकारने गेल्या वर्षी ही योजना सुरू केली होती. सरकारच्या या योजनेने मोठी मदत होणार असल्याने कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण न सापडण्यामागे "हे" आहे महत्त्वाचं कारणhttps://t.co/52eU6r756H#coronavirus#CoronaVirusUpdates#India
— Lokmat (@MiLOKMAT) December 10, 2020