खाद्यसंस्कृतीवर सरकारचे निर्बंध नसतील : सिंह
By admin | Published: June 14, 2017 03:49 AM2017-06-14T03:49:39+5:302017-06-14T03:49:39+5:30
कत्तलींसाठी गुरांच्या विक्रीवर केंद्राने घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ मिझोरामच्या ऐझवाल शहरात शेकडो लोक रस्त्यावर उतरल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह
ऐझवाल : कत्तलींसाठी गुरांच्या विक्रीवर केंद्राने घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ मिझोरामच्या ऐझवाल शहरात शेकडो लोक रस्त्यावर उतरल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सरकार कोणाच्याही जेवणात वा खाद्यसंस्कृतीत ढवळाढवळ करणार नाही, असे मंगळवारी स्पष्ट केले. गुरांच्या विक्रीवरील नव्या नियमांविरुद्ध स्थानिकांनी केलेल्या निदर्शनांबाबत पत्रकारांनी सिंह यांना छेडले असताना त्यांनी वरील उत्तर दिले. सिंह यांच्यासोबत उपस्थित असलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही सरकार लोकांच्या अन्नाच्या निवडीवर कोणतेही निर्बंध लादणार नसल्याचे सांगितले.
कोणी काय खावे हे ठरविण्याच्या आपल्या अधिकारावर निर्बंध घालण्याचा केंद्राचा प्रयत्न असून, आम्ही त्याविरुद्ध लढत आहोत, अशा पोस्ट निदर्शकांनी समाजमाध्यमांवर टाकल्या आहेत. ईशान्येकडील राज्यात गोमांस हे मुख्य अन्न असून, गुरांच्या विक्रीवरील नवे नियम जारी झाल्यापासून राज्यात ठिकठिकाणी ऐझवालसारखी आंदोलने होत आहेत.